हनोई: 'इथे नवरदेव भाड्याने मिळतील' असा फलक जर तुमच्या वाचनात आला तर, तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही नक्कीच बुचकाळ्यात पडाल आणि स्वत:शीच विचाराल असे कुठे असते का? पण, आम्ही सांगतो ना, असे असते. जगात एक असाही देश आहे. जिथे खरोखरच नवरदेव भाड्याने मिळतात. 


नातेवाईकही मिळतात भाड्याने


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही बोलतोय व्हिएतनाम विषयी. या देशातील काही कंपन्या चक्क नवरदेव भाड्याने देऊन प्रचंड पैसा कमाताना दिसत आहेत. तेही राजरोसपणे. या देशात जणू काही अशा कंपन्यांचे पेवच फुटले आहे. विशेष असे की, या कंपन्या केवळ नवरदेवच नव्हे तर, नातेवाईकही भाड्याने देतात. एका लग्नात नवरेदव आणि नातेवाईक भाड्याने (मामा, मामी, काका, काकी, आत्या, मावशी आदी.) देण्यासाठी कमीत कमी ४ लाख रूपये शुल्क आकारले जाते. ग्राहकाच्या मागणीनुसार या कंपन्या २० ते ४०० पाहुण्यांची व्यवस्था करू शकतात.


लाखो रूपयांमध्ये विकतात नवरदेव


दरम्यान, व्हिएतनाममध्ये समस्या असी की, येथील अनेक मुली या कुमारी माता बनतात. यात धक्कादायक असे की, बिना लग्नाची एखादी मुलगी जर गरोदर राहिली तर, तो कलंक मानला जातो. त्यामुळे या सामाजिक कलंकातून मुक्तता मिळविण्यासाठी बनावट विवाह केले जातात. अशा आडल्या-नडल्या कुटुंबियांना गाठून या कंपन्या प्रचंड फायदा कमावतात. गर्भवती मुलींसोबत केवळ दिखावा म्हणून लग्न करण्यासाठी या कंपन्या भाडेतत्वावर नवरदेव पुरवतात. त्यासाठी शुल्क म्हणून या कंपन्या लाखो रुपये आकारतात. हे शुल्क नवरदेवांच्या आणि मुलीच्या प्रतवारीनुसार (आर्थिक) ठरते.


भाडेतत्वावरचा नवरा असोत पहिलाच विवाहीत


धक्कादायक असे की, भाडतत्वावर नवरदेव म्हणून लग्नाच्या मंडपात उभा राहणे हा एक तिथला व्यवसायच बनला आहे. भाडेतत्वावर लग्नासाठी उभा राहिलेले बहुतांश नवरेदव हे आगोदच विवाहीत असतात. इतकेच नव्हे तर, ते एक, दोन मुलांचे पिताही असतात.पण, अविवाहीत गर्भवती मुली आणि त्यांचे कुटुंबीय त्यांना भाडेतत्वावर खरेदी करतात आणि त्यावर त्यांना काहीच चुकीचे वाटत नाही.