Al Hutaib Village Of Yemen: शाळेत असताना निसर्गाचे ऋतुचक्र आपण शिकले असाल. सामान्यत: आपल्याला उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू माहित असतात. प्रत्येक ऋतुचे वेगळे असे महत्त्व आहे. या तीन ऋतुतील एक पावसाळा हा ऋतुचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पावसाळ्यात झाडांना पालवी फुटते तर, शेतीची कामे हाती घेतली जातात. पाण्याचे स्त्रोत अखंड वाहण्यास सुरुवात होते. पण तुम्हाला माहित्येय का जगात असं एक गाव आहे जिथे आजवर एकदाही पाऊस पडलेला नाही. तरीही या गावाचे सौंदर्य अबाधित आहे. या गावात साधारण मागील 14 दशलक्ष वर्षात पाऊसच पडला नाहीये. पाऊस नसला तरीही या गावचे सौंदर्य अनेकांना आकर्षित करते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यमन देशाची राजधानी सना येथील एका गावात अद्याप पाऊसच झाला नाहीये. एका मीडिया रिपोर्यनुसार, साधारण 14 दशलक्ष वर्षात इथे पाऊस पडलेला नाहीये. सना शहराच्या हरज क्षेत्रास वसलेल्या अल हुतैब या नावाच्या गावात वरुणराजा अद्याप बरसला नाहीये. असं म्हणतात की , एकदाही इथे पाण्याचा एक थेंबही पडला नाहीये. या गावातील प्रदेश उष्णकटिबंधीय प्रदेश असून येथे तापमान अधिक असते. पण त्याचबरोबर थंडीच्या दिवसांतही या भागात तापमान अल्हाददायक असते. उन्हाळा आणि हिवाळा हे दोन्ही ऋतु इथे असले तरी पावसाळ्यात पावसाचा एक थेंबही या गावात पडत नाही. 


अल हुतैब या गावात प्राचीन व आधुनिक दोन्ही प्रकारच्या वास्तुकलेचा संगम दिसून येतो. गावात ग्रामीण व शहरी अशा दोन्ही पद्धतीची घरे दिसून येतात.या गावात बहुतांश लोकसंख्या ही अल बोहरा व अल मुकरमा या समुदायाची आहेत.हे गाव पृथ्वीपासून म्हणजेच समुद्र सपाटीपासून 3200 मीटर उंचीवर आहे. तसंच, ढगांची निर्मिती साधारण 200 मीटर उंचीवर होत असते त्यामुळंच या गावात आजपर्यंत कधीच पाऊस झाला नाहीये. अल हुतैब गाव हे एका उंच डोंगराच्या टोकावर असल्याने तिथील खालचे दृश्य अत्यंत निसर्गरम्य भासते. डोंगराच्या उंचावर राहत असल्याने आणि खाली पांढऱ्या शुभ्र ढगांची दाटी यामुळं या गावातील लोकांना जणू स्वर्गातच राहत असल्याचा अनुभव येत असेल. 


गावाच्या चहूबाजूंनी ढग दिसून येतात.तर मधोमध गाव. गावकऱ्यांनाही ढग वाहत येतानाचा अनुभव 12 महिने घेता येतो. हे अद्भूत निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी इथे पर्यटकांची खूप गर्दी असते.