Pakistan Constutution Day : देशभरात आज 75व्या प्रजासत्ताक दिनाचा (Republic Day) उत्साह आहे.. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या (Draupadi Murmu) हस्ते ध्वजवंदन झाल्यानंतर कर्तव्यपथावर भारताच्या संस्कृतीचं आणि सामर्थ्याचं दर्शन घडलं. यावर्षी पहिल्यांदा महिलांच्या पथकानं परेडची सुरुवात झाली. त्यांनंतर भारतीय सैन्याच्या तिनही दलाच्या जवानांनी कर्तव्यपथावर शानदार संचलन केलं.. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. पण कधी विचार केला आहे का शेजारच्या पाकिस्तान (Pakistan) देशातही असा दिवस साजरा केला जात का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो तर कधी असतो? भारताप्रमाणेच या दिवशी परेड असते का? असे प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडले असतील. 


कधी असतो पाकिस्तानात प्रजासत्ताक दिन?
ज्या दिवशी संविधान लागू झालं तो दिवस भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झालं. त्याचप्रमाणे पाकिस्तानातही ज्या दिवशी संविधान लागू झालं त्याच दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. पण पाकिस्तानात या दिवसाला 'पाकिस्तान डे' किंवा 'नॅशनल डे' (Pakistan National Day) असं म्हणतात. भारतीय प्रजासत्ताक दिनाप्रमाणेच नॅशनल डे पाकिस्तानात साजरा केला जातो. 


केव्हा साजरा केला जातो नॅशनल डे?
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकाच दिवशी स्वातंत्र्य झाले. स्वातंत्र्याच्या तीन वर्षांनी म्हणजे 1950 मध्ये भारतात संविधान लागू झालं. पण पाकिस्तानात संविधान लागू व्हायरला तब्बल नऊ वर्ष वाट पाहावी लागली. पाकिस्तानात 23 मार्च 1956 मध्ये संविधान लागू झालं. त्यामुळे 23 मार्च हा दिवस पाकिस्तानात नॅशनल डे म्हणून साजरा केला जातो. पाकिस्तानला इस्लामिक गणराज्यही जाहीर करण्यात आलं होतं. पाकिस्तानात हा दिवस यौम-ए-पाकिस्तान म्हणून ओळखला जातो. 


नॅशनल डेला परेड होते?
भारताप्रमाणेच पाकिस्तानात नॅशनल डे अर्थात 23 मार्चला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पाकिस्तानातही या दिवशी परेडचं आयोजन करण्यात येतं. या सोहळ्याचं प्रमुक पाहुणे राष्ट्रपती असतात. पाकिस्तानच्या सशस्त्र दलाकडून केली जाणारी परेड हे या दिवसांच मुख्य आकर्षण असतं. याशिवाय पाकिस्तानातील विविध राज्य आणि संस्कृतीचं दर्शनही या दिवशी केलं जातं. या दिवशी पाकिस्तानच्या राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष पदक आणि सन्मान बहाल केले जातात. 2008 नंतर काही वर्ष सुरक्षेच्या कारणास्तव परेड बंद करण्यात आली होती. पण 23 मार्च 2015 पासून पुन्हा एकदा परेडचं आयोजन होऊ लागलं.