मुंबई :  जगात राहण्याच्या दृष्टीकोनातून लायक (Global Liveability Index) आणि नालायक शहरांची यादी इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिट(EIU)ने नुकतीच जाहीर केली. जगातील तब्बल 172 शहरांचा अभ्यास केल्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 10 शहरांबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्यांचा गणना ही नालायक शहरांमध्ये करण्यात आलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्लोबल लिवेबिलिटी इंडेक्स अशा शहरांची यादी बनवताना त्या ठिकाणी असलेल्या पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, शिक्षण, संस्कृती आणि मनोरंजन या घटकांचा आढावा घेतला जातो. या यादीत नाव आहे ते आपल्या शेजारील देशाचं अर्थातच पाकिस्तानचं. पाकिस्तानची राजधानी असलेल्या कराची (Karachi City) शहराचं नाव या यादीत पुन्हा एकदा आलं आहे.


नालायक शहरांच्या यादीत प्रथम स्थान मिळवलं ते इराणमधील तेहरान शहरानं. दुसऱ्या स्थानी कॅमेरूनमधील डौआला, तिसऱ्या स्थानी झिम्बाब्वेमधील हरारे, चौथ्या स्थानी बांगलादेशमधील ढाका, पाचव्या स्थानी पोर्ट मोरेस्बी, सहाव्या स्थानी कराची, सातव्या स्थानी अल्जेरियामधील अल्जियर्स, लिबियामधील त्रिपोली आठव्या, नायरेजियामधील लागोस नवव्या तर सिरियामधील दमास्कस हे दहाव्या स्थानावर आहे.


मागिल काही दिवसांपासून पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आला आहे. तिजोरीतून कमी होत असलेल्या परकीय चलन साठ्यामुळे आणि वाढत्या महागाईमुळे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती हलाखीची होतीये. UNDP ने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानवर 250 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज आहे.


इकोनॉमि्सट इंटेलिजेंस युनिटने जाहीर केलेल्या लायक शहरांच्या यादीमध्ये ऑस्ट्रियातील व्हिएन्ना प्रथम क्रमांक पटकवला आहे. त्यानंतर डेन्मार्कमधील कोपनहेगन, स्वित्झर्लंडमधील झुरिक, कॅनडातील कॅलगरी आणि व्हँकुव्हर यांचा अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक लागतो. सहाव्या स्थानावर स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा, सातव्या स्थानावर जर्मनीमधील फ्रँकफर्टचा नंबर लागतो. कॅनडामधील टोरोंटो आठव्या, नेदरलँडमदील अम्स्टरडॅम नवव्या तर दहाव्या स्थानावर जपानमधील ओसाका आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या दोन शहरांनी स्थान मिळवले आहे. लायक आणि नालायक शहरांच्या यादीत भारतातील एकाही शहराचा समावेश नाही.