३० पाहुण्यांसाठी ६० मुली... पर्यटनाची जाहिरात वादात!
सोशल मीडियावर `गुड गर्ल्स कंपनी`च्या एका जाहिरातीचा व्हिडिओ वायरल होताना दिसतोय.
मुंबई : सोशल मीडियावर 'गुड गर्ल्स कंपनी'च्या एका जाहिरातीचा व्हिडिओ वायरल होताना दिसतोय.
या व्हिडिओमध्ये लोकांना २४ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबरपर्यंत कोलंबियाच्या एका बेटावर हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी ऑफर दिल्या जात आहेत.
धक्कादायक म्हणजे, या व्हिडिओत मुलीही विकत मिळतील, असा दावा करण्यात आलाय. या ऑफरमध्ये केवळ ३० लोकांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. या खास पाहुण्यांसाठी कंपनीनं ६० मुलींचा बंदोबस्त करून ठेवलाय. या मुली पाहुण्यांच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध असतील, असंही म्हटलं गेलंय.
या जाहिरातीनंतर एका नव्या वादाला तोंड फुटलंय... ही मुलींची जाहिरात आहे की पर्यटनाची जाहिरात? असा प्रश्न विचारला जातोय. लंडनच्या Enraged mayor Sergio नं ट्विटरवर या जाहिरातीवर कडाडून टीका केलीय. 'हे टूरिझम नाही... तर त्याचा अपमान आहे...' तर कोलंबियाचे इंटिरिअर मिनिस्टर फर्नांडो निनो यांच्या म्हणण्यानुसार, आमच्याकडून अशा कोणत्याही इव्हेंटची परवानगी घेण्यात आलेली नाही.
<iframe width="700" height="400" src="https://www.youtube.com/embed/7IIqQzGDYL8" frameborder="0" gesture="media" allowfullscreen></iframe>