मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता जास्त धोका आहे तो डेल्टा प्लसचा... डेल्टा प्लसनं धुमाकूळ घालायला सुरुवात केलीये. पण आता लवकरच डेल्टा प्लसचा कर्दनकाळही येणार आहे. त्याची तयारी सुरू झालीये. कोरोनावर जेवढ्या व्हॅक्सिन आल्या आहेत. त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात कोरोनाचे व्हेरियंट तयार झालेत. त्यामुळे कुठली लस कुठल्या व्हेरियंटवर प्रभावी ठरणार याबद्दल जगभरात शंका व्यक्त केली जातेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता कोरोनाला मुळासकट उखडून काढणारी सुपर व्हॅक्सिन लवकरच येणार आहे. 
- अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात ही सुपर व्हॅक्सिन तयार करण्यात आलीय
- कोरोनाच्या सगळ्या व्हेरियंट्सवर ही लस प्रभावी असल्याचा दावा करण्यात आलाय
- ही लस डेल्टा प्लस व्हेरियंटचाही खात्मा करु शकते, असा दावा आहे
- या लसीची उंदरांवरची चाचणी यशस्वी झालीय
- आता लवकरच माणसांवरची चाचणी सुरू होणार आहे 
- प्राण्यांपासून माणसाला होणा-या संसर्गापासून ही लस संरक्षण करते
- एमआरएनए प्रकारातली ही लस आहे
- फायझर आणि मॉडर्नाच्या लसीही याच प्रकारातल्या आहेत
- कोरोना आणि सार्समध्ये आढळणारा मूळ घटक ‘सरबेकोव्हायरस’ आहे
- ही सुपर व्हॅक्सिन थेट  ‘सरबेकोव्हायरस’ वरच हल्ला करते आणि त्याला नष्ट करते.


एक व्हॅक्सिन तयार व्हायला साधारण वर्ष लागतं. पण कोरोनाचे नव नवीन व्हेरियंट्स अवघ्या काही दिवसांतच जन्माला येतायत. त्यामुळे त्यांच्यावरचे उपायही तेवढ्य़ा वेगानं शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्य़ाच पार्श्वभूमीवर आता ही सुपर व्हॅक्सिन लवकर येईल आणि डेल्टा प्लससह कोरोनाच्या सगळ्या व्हेरियंटसचा कर्दनकाळ ठरेल, अशी अपेक्षा आहे.