वॉशिंग्टन : अमेरिकेत राहणारे मूळ भारतीय लोक भारतातील ग्रामीण भाग विकसित करणार आहेत. त्यासाठी अनिवासी भारतीय ५०० गावे दत्तक घेणार आहेत. याबाबतची घोषणा जुलैमध्ये सिलिकॉन व्हॅलीत 'बिग आयडियाज फॉर बेटर इंडिया' या संम्मेलनात होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार ओव्हरसीज व्हालेंटिअर फॉर बेटर इंडिया (ओव्हीबीआय) यांच्या तर्फे या संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संम्मेलनात आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर हे मुख्य व्याख्यान देणार आहेत. या कार्यक्रमात १००० पेक्षा जास्त अनिवासी भारतीय नेते भाग घेणार आहेत.


ओव्हीबीआयचे अध्यक्ष सतेज चौधरी यांनी शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यसाठी पाऊल उचलले आहे. तसेच ग्रामीण भारतातील बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी ५०० गावे दत्तक घेण्याचे ठरविण्यात आलेय.


आम्ही २०२२ पर्यंत शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. उत्पन्न दुप्पट वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत. कृषी तज्ज्ञ आणि उद्योजक आणि प्रशासन यांना एकत्र घेऊन काम करण्याबाबत आणि समस्या दूर करण्यासाठी चर्चा करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.