Google Tweet Viral: सर्च इंजिन गुगलने बुधवारी ट्विटर वापरकर्त्यांना एक मजेशीर प्रश्न विचारला. पाळीव कुत्रे जर सर्च इंजिन वापरत असतील तर ते काय शोधतील? याबाबत गुगलला जाणून घ्यायचं आहे. गुगलची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. या प्रश्नाला यूजर्संनी मजेशीर उत्तरं दिली आहेत. गुगलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर वापरकर्त्यांना विचारले आहे की, 'तुमचा कुत्रा गुगल वापरत असेल तर तो काय शोधेल?'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलचे 25.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि त्यापैकी काहींनी सांगितले की, कुत्र्यांना अन्न शोधण्यात आनंद होईल. तर एका यूजर्सने लिहिले की, 'तो खेळाच्या मैदानावर जाण्यासाठी उबेर बुक करेल.' दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'कुकीजचे दुकान जवळपास कुठे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करेल.' त्याचवेळी गुगलच्या प्रश्नाला आणखी युजरने उत्तर दिले की, 'इतर कुत्र्यांकडून माइन्स कसे हिसकावेत.' 



युजर्सची मजेशीर उत्तर वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही.आणखी एकाने लिहिलं की, 'एक मेल डॉग त्याच्या गर्लफ्रेंडला कसे प्रभावित करावे.' हे सर्च करेल. दुसर्‍याने लिहिले, 'माणसांना कसे प्रशिक्षण द्यावे जेणेकरून ते सर्व कुत्रे आणि मांजरींना अन्न व्यवस्थित देतील.' अशा इतर लोकांनीही मजेशीर पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. हे ट्विट 22 जून रोजी पोस्ट करण्यात आले होते आणि आतापर्यंत 2,000 हून अधिक लाईक्स आणि 150 हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत.





कुत्रे आणि मांजरी हे सर्वात लोकप्रिय पाळीव प्राणी 


सोशल मीडिया यूजर्संना त्यांच्या पाळीव प्राण्यांबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे देणे आवडते. कुत्रे आणि मांजरी हे सर्वात लोकप्रिय पाळीव प्राणी आहेत. बरेच यूजर्स प्राण्यांचे व्हिडीओ पोस्ट करत राहतात. या व्हिडीओंना सोशल मीडियावर हजारो लोक पसंत करतात.