मुंबई : गुगलने अतिशय धक्कादायक माहिती समोर आणली आहे. गुगलने गेल्या 2 वर्षांत लैंगिक अत्याचाराच्या आरोपांतर्गत 48 लोकांना कामावरून काढून टाकलं आहे. यामध्ये 13 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. गुगलने गैरव्यवहारांवर कडक कारवाई केली आहे. अमेरिकेतील दिग्गज कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांच्याकडून ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूयॉर्क टाइम्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, गुगलच्या एका वरिष्ठ कर्मचारी, एंड्रॉयडचा निर्माण करणारे एंडी रूबिनवर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावल्यानंतर त्यांनी त्याला नऊ करोड डॉलर एक्झिट पॅकेज देऊन कंपनीमधून काढून टाकलं आहे. तसेच असे देखील सांगण्यात आलं की, गुगलने लैंगिक अत्याचाराचे आरोप लपवण्यासाठी अशापद्धतीचे कार्य केले आहेत. 


या बातमीवर मीडियाने गुगलची प्रतिक्रिया मागवली. तेव्हा पिचाई यांच्याकडून कर्मचाऱ्यांना एक मेल पाठवण्यात आला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की, 48 कर्मचाऱ्यांमध्ये 13 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना कोणतंही एक्झिट पॅकेज देण्यात आलेलं नाही.