Google Employee 300% Salary Hike : नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठीच काही गोष्टींचं अतीव महत्त्वं असतं. हे घटक म्हणजे पगार आणि गरजेच्या वेळी दिल्या जाणाऱ्या सुट्ट्या. काही मंडळी कामाची पद्धत, नव्या संधी, कामाच्या ठिकाणचे सहकारी या गोष्टींनाही तितकंच महत्त्वं देतात. तुम्ही यापैकी कोणत्या गटात मोडता? गंमत म्हणजे, जेव्हा वर्षातून एकदा (Salary) पगारवाढीची वेळ येते आणि संस्था अपेक्षित पगारवाढ (Salary Hike) देत नाही तेव्हा मात्र कर्मचाऱ्यांकडून नोकरी (Job) बदलण्याचा विचार होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलमध्येही नोकरी बदलण्याच्या विचारात असणाऱ्या अशाच एका कर्मचाऱ्याला कंपनीनं आश्चर्याचा धक्का दिला. गेल्या काही काळापासून गुगल (Google) मध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली. हजारो कर्मचारी कंपनीच्या एका निर्णयामुळं अडचणीत आले. पण, अनेकांना नोकरीवरून काढणाऱ्या याच गुगलनं एका कर्मचाऱ्याला इतकी पगारवाढ देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला की अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 


गुगलमधील एक कर्मचारी नोकरी सोडून दुसऱ्या संस्थेमध्ये नोकरीवर रुजू होण्याच्या तयारीत असतानाच कंपनीनं त्याच्या सध्याच्या पगारावर 20- 30 टक्के नव्हे तर, तब्बल 300 टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला. 'बिझनेस टुडे'च्या वृत्तानुसार गुगलमधील एक कर्मचारी आयआयटी मद्रासच्या माजी विद्यार्थ्यानं सुरु केलेल्या झालेल्या Perplexity AI नावाच्या स्टार्टअप कंपनीमध्ये जाऊ पाहत होता. पण, गुगलनं त्या कर्मचाऱ्याच्या पगारात इतकी वाढ केली की त्यानं तिथंच थांबण्याचा निर्णय घेतला. 


हेसुद्धा वाचा : मुंबईकरांच्या हक्काच्या घराबाबत फडणवीसांचं आश्वासक वक्तव्य; तुम्हालाही फायदा होण्याची दाट शक्यता


 


बिग टेक्नोलॉजी पॉडकास्टमध्ये Perplexity AI चे सीईओ अरविंद श्रीनिवास यांनीच ही थक्क करणारी माहिती दिली. सध्याचा काळ असा आहे की, गुगल त्यांच्या कर्मचाऱ्यांना थांबवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. किंबहुना माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या कर्मचाऱ्यांना नोकरीच्या सुरक्षिततेची हमी देण्यासाठी किंवा कर्मचारीकपात करण्यासाठी नेमक्या कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकतात याबाबत बरीच अनिश्चितता आहे. पण, सहसा कंपन्यांकडून सर्वाधिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच ही कात्री चालण्याची सर्वाधिक भीती असते असंही श्रीनिवास म्हणाले. 


गुगलनं कर्मचाऱ्यांना दिलेली घसघशीत पगारवाढ एकाएकी चर्चेचा विषय ठरण्यामागचं कारण म्हणजे कंपनीमध्ये सुरु असणारी नोकरकपात. 2023 किंबहुना 2022 पासूनच IT क्षेत्रामध्ये नोकरकपातीची सुरुवात झाली. यामध्ये गुगलच्या हार्डवेयर, सेंट्रल इंजीनियरिंगसह Google Assistant सारख्या विभागांमध्ये काम करणाऱ्या 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला. पण, एक कर्मचारी मात्र या साऱ्याला अपवाद ठरला, कारण त्याच्या वाट्याला आली चक्क 300 टक्क्यांची पगारवाढ!