Google layoff : गेल्या काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर सुरु असलेली आर्थिक मंदी (recession), महागाई यामुळे बड्या कंपन्यांमध्ये नोकर कपात सुरुय. इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरचे (Twitter) सुत्रे हाताच घेताच सुरुवातीला याबाबत निर्णय घेतला आणि अनेक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. त्यापाठोपाठ फेसबुकने (Facebook) भारतासह अनेक देशांमध्ये आपली कर्मचारी घरी बसवले. त्यानंतर गुगलने (Google) एकाच वेळी तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची तयारी सुरु केली होती. दुसरीकडे आता गुगलने कंपनीतल्या 100 रोबोट्सनाही (Robot layoff) नारळ दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्मचार्‍यांच्या कपातीननंतर आता गुगलने रोबोट्सना काढण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने काढून टाकलेले रोबोट्स गुगल ऑफिसच्या (Google Office) कॅफेटेरियाची साफसफाई करण्याचे काम करत होते. या रोबोट्सचा खर्च उचलणे कंपनीला कठीण जात असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने आपला एव्हरी डे रोबोट्स विभाग बंद केला आहे. हा विभाग त्या रोबोंना प्रशिक्षण देऊन विकसित करायचा.


एव्हरी डे रोबोट्स हा प्रायोगित तत्वावर सुरु असलेला रोबोटिक प्रोजेक्ट होता. यामध्ये 200 हून अधिक लोक काम करत होते. हे सर्व कर्मचारी विविध प्रकल्पांवर काम करायचे. यामध्ये 100 हून अधिक रोबोट्स होते. या रोबोट्सचा वापर कॅफेटेरिया टेबल साफ करण्यासाठी, कचरा गोळा करण्यासाठी आणि दरवाजे उघडण्यासाठी केला जायचा. कोविड काळात कॉन्फरन्स रूम्सच्या साफसफाईसाठीही या रोबोटचा वापर करण्यात आला होता.


नेमकं कारण काय?


रोबोट विभाग  बंद झाल्यामुळे त्यातील काही तंत्रज्ञान इतर विभागांसाठी वापरता येणार आहे. हे रोबोट उपयोगाचे असले तरी त्यांच्या देखभालीचा खर्च जास्त होता. तज्ञांच्या मते, तो हजारो डॉलर्स इतका होता. हाच खर्च कंपनीला परवडत नव्हता. तर काही रोबोट उपयोगाचे नसल्याने काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे आता अल्फाबेटने 100 रोबोट्सना कामावरुन काढून टाकले आहे. दुसरीकडे काही रोबोटचा वापर गुगल करणार आहे.