Google Layoff News : आर्थिक मंदी आणि Artificial Intelligance चा वाढता वापर या आणि अशा इतर काही कारणांमुळं साधारण मागील दोन वर्षांपासून जागतिक ख्यातीच्या अनेक मोठ्या कंपन्यांमधून नोकरकपात करण्यात आली आहे. सातत्यानं सुरु असणाऱ्या या नोकरकपातीचा धस्का आता इतरही क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांनीही घेतला असतानाच गुगल या नावाजलेल्या कंपनीमध्ये नोकरीवरून काढताना नेमकी कर्मचाऱ्यांची काय अवस्था असते, याची धक्कादायक माहिती समोर आल्यानं अनेकांनाच घाम फुटला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Google मध्ये काम करणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरनं त्याला नोकरीवरून काढण्याच्या क्षणाचा उल्लेख केला आणि अनेकांच्या काळजात धस्स झालं. LinkedIn वर या गुगलच्या माजी कर्मचाऱ्यानं हा अनुभव सांगितला. मूळचा चीनचा असणारा हा कर्मचारी H-1B visa च्या मदतीनं अमेरिकेत काम करत होता. ज्या रात्री गुगलनं आपल्याला नोकरीवरून काढलं, त्या क्षणांची माहिती त्यानं सोशल मीडियाच्या माधघ्यमातून दिली. 


'त्या' रात्री नेमकं काय घडलं? 


घरी रात्रीचं जेवण झाल्यानंतर आणि टीव्ही पाहिल्यानंतर रात्रीच्याच वेळी तो घराच्या खालच्या मजल्यावर आला जिथं तो एका मिटींगची तयारी करणार होता. ही तिच मिटींग होती जिथं तो मुलाखत घेणार होता. त्यानं लॅपटॉप सुरु केला आणि काहीतरी चुकीतंय याची जाणीव त्याला झाली. 
'You Cloudtop StopInstance operation has begun' असा मेसेज त्याला दिसला. पण, हा प्रकार काही दिवसांपूर्वीच झाल्याचं अर्थात हे सत्र होऊन गेल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि गोष्टी चुकत असल्याची कुणकुण त्याला लागली. ज्यानंतर त्यानं गुगलच्याच इंटर्नल सर्चच्या वापरानं नेमकं काय घडतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कंपनी सोडावी लागणार हे वास्तवच तो पचवू शकला नाही. ती आपल्या जीवनातील सर्वाधिक दीर्घकाळ चालणारी पाच मिनिटं होती, असंच त्यानं पोस्टमध्ये म्हटलं. 


हेसुद्धा वाचा : Mumbai News : सावध व्हा! 4 महिन्यांमध्ये 22 दिवस समुद्र खवळणार, नेमका कधी वाढणार धोका? पाहा 


एकामागून एक त्याला विविध वेबसाईटचा अॅक्सेस बंद करण्यात आला, इच्छा नसताना त्याचा लॅपटॉप रिबूट झाला आणि अखेर नोकरीसंदर्भातील 'तो' ईमेल त्याला दिसला. आपल्या सहकाऱ्यांसमवेतही असंच काहीतरी घडलंय का हे पाहण्यासाठी त्यानं त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पुढं निरोपाचा ईमेल टाईप करत असतानाच त्याच्या मॅनेजरनं आपल्यालाही नोकरीवरून काढल्याचा ईमेल या सहकाऱ्यांना पाठवल्याचं त्याच्या लक्षात आलं. 13 वर्ष गुगलसाठी काम केलेल्या त्या कर्मचाऱ्यानं, हा Email लिहिताना आपले हात थरथरत असल्याचं सांगत तो कठीण प्रसंग सर्वांपुढे मांडला. 



मॅनेजरनं पाठवलेले ते शब्द वाचताना आपलेही हातपाय थरथरत असल्याच्या शब्दांत मनातील भीती, अमेरिकेत काम करणाऱ्या चीनमधील त्या Software Engineer नं व्यक्त केली. 'कोणा एका कर्मचाऱ्यानं आपल्या, नव्हे गुगलच्या ऑफिसमधील फोटो शेअर केल आणि डोळ्यात टचकन पाणी आलं...' अशा शब्दांत त्या नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यानं आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.