मुंबई: आजचा धकाधकीच्या आणि वेगवाग आयुष्यात लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यावर गेम आणि गुगल सर्च करण्यासाठी आज प्रत्येकाचे डोळे लागले आहेत. मोबाईलपासून जरा दूर जाऊन मैदानी खेळ खेळण्याची मूड आज होत नाही. सतत मोबाईलवर क्रिकेट, फुटबॉल सारखे गेम्स खेळण्यात आनंद मानला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये मात्र गुगलचे CEO मैदानात उतरले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलचे CEO सुंदर पिचाई रस्त्यावर क्रिकेट खेळण्यासाठी उतरले आहेत. जे स्वत: गुगलचे CEO असून त्यांचा काही वेळ हा मैदान किंवा रस्त्यावर खेळण्यात घालवत आहेत. त्यांनी आपला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोची चर्चा होत आहे. सुंदर पिचाई हे स्वत: रस्त्यावर क्रिकेट खेळत असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. या फोटोची जगभरात चर्चा होत आहे. 



या फोटोमध्ये पाहू शकता पिचाई बॅटिंग करत आहेत. त्यांना विकेट मिळाले नाही म्हणून त्यांनी एका बॉक्सला स्टम्प बनवलं आहे. त्यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. एका युझरने जगातला सर्वात उत्कृष्ट CEO अशी कमेंट केली आहे. तर अनेक युझर्सनी त्यांना बॅट कशी पकडायची आणि कसं खेळायचं हे माहीत असल्यानं आनंद व्यक्त केला.


आपण सगळे जण गुगल किंवा मोबाईलच्या इतके आहारी गेलो आहोत की आपल्याला मैदानी खेळांचा विसर पडलाय. आताच्या नव्या पिढीला तर कित्येक मैदानी खेळ माहीत देखील नाहीत. जस पिचाई यांनी मैदानी खेळांचा विसर पडला नाही. तसंच तो आपल्यालाही पडता कामा नये. कितीही धकाधकीचं जीवन असलं गुगलवर तासंतास वेळ घालवत असलो तरी किमान दिवसातला काही वेळ हा मैदानात घालवायला हवा.