Ukraine Letter to G7: रशियाने युद्ध लादलेल्या युक्रेनने संपूर्ण जगावर एक लेटर बॉम्ब टाकला आहे. सध्या आपलं लक्ष्य 2 मुस्लीम देश असल्याचं युक्रेनने म्हटलं आहे. ब्रिटनने 'द गार्डियन'ने दिलेल्या वृत्तानुसार युक्रेन आता इराण आणि सिरीयावर हल्ला करण्याच्या तयारीमध्ये आहे. यासंदर्भात युक्रेनने थेट जी-7 देशांना पत्र लिहून कळवलं आहे.


लेटर बॉम्बमध्ये काय म्हटलंय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युक्रेन इराण आणि सिरीयावर संतापला आहे. आपल्या देशावर रशियाकडून डागली जात असणारी क्षेपणास्त्रं ही इराण आणि सिरीयामध्ये तयार करण्यात आलेली आहेत, असा युक्रेनचा दावा आहे. त्यामुळेच आता या देशांना धडा शिकवण्यासाठी युक्रेन हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. युक्रेनने जगातील 7 सर्वात शक्तीशाली देश असलेल्या जी-7 गटाला लिहिलेल्या पत्रामध्ये मागील 3 महिन्यांमध्ये झालेल्या क्षेपणास्त्रं हल्ल्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगड्म आणि अमेरिका या 7 देशांचा समावेश असलेल्या जी-7 देशांना लिहिलेल्या पत्रामध्ये, "मागील 3 महिन्यांमध्ये युक्रेनवर रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपैकी बहुतांश क्षेपणास्त्रं ही इराणमधील आहेत," असं म्हटलं आहे.


युक्रेनला नेमका कुठे हल्ला करायचा आहे?


आता युक्रेनने या वादामध्ये जी 7 देशांना पत्र लिहिण्याचं कारण काय असा प्रश्न पडला असेल तर युक्रेनच्या दाव्यानुसार ज्या ड्रोन्सच्या माध्यमातून रशिया युक्रेनवर क्षेपणास्त्र डागत आहे त्यामधील सुटे भाग हे जी-7 देशांमधील कंपन्यांची निर्मिती असल्याचा दावा केला आहे. त्यामुळेच आता युक्रेन इराणमधील क्षेपणास्त्रांच्या कारखान्यांवर हल्ला करुन ते उद्धवस्त करण्यासाठी इराण आणि सिरियावर हल्ल्याचा विचार करत आहे. या हल्ल्यामुळे युक्रेन इराणमध्ये ज्या ज्या ठिकाणी क्षेपणास्त्रांची निर्मिती होते त्या ठिकाणांवर बॉम्ब हल्ले करण्याचा विचार करत आहे. 


तिसऱ्या महायुद्धाची शक्यता


मात्र युक्रेनने इराणवर हल्ला केला तर जगात तिसरं महायुद्ध सुरु होईल. इराण हा फार आक्रमक आणि अणवस्त्र असलेल्या देशांपैकी एक आहे. त्याच्यावर हल्ला झाल्यास तो नक्कीच युक्रेनला जशास तसं उत्तर देण्यास मागे पुढे पाहणार नाही, असं या क्षेत्रातील तज्ञ सांगतात. आता जगातील 7 प्रभावशाली देशांना युक्रेनने थेट इराण आणि सिरीयावर हल्ला करण्याचा मानस बोलून दाखवल्याने जागतिक स्तरावरील अशांतता वाढल्याचं सांगितलं जात आहे. आता या संदर्भात जी-7 देश काय भूमिका घेतात, ते इराणला यासंदर्भात समज देतात का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


युद्ध थांबवण्यात अपयश


रशिया आणि युक्रेनमध्ये 2022 च्या फेब्रुवारी महिन्यापासून युद्ध सुरु आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत दोन्ही देशांनी एकमेकांवर हजारो क्षेपणास्त्रांनी हल्ले केले आहेत. युद्धात हजारो लोकांचा मृत्यू झाला असून अगदी संयुक्त राष्ट्रांपासून युरोपीयन महासंघानेही हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केले असले तरी त्यात त्यांना अपयशच आलं आहे.