Gucci Grass Stained Jeans: फॅशनची व्याख्या आता हळूहळू बदलत जात आहे असंच म्हणता येईल कारण दिवसेंदिवस ज्याप्रकारे फॅशन क्षेत्रातले बदल होतायत ते पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे फॅशन पुढारलेली असं आपण म्हणतो परंतु आता फॅशन क्षेत्रात (Fashion Industry) मोठमोठे बदल होताना दिसत आहेत ज्यातून नक्की ही फॅशन मागे तर जात नाही तर अशा संशय येईल. सध्या अशाच एका जीन्सनं संपुर्ण शहरात खळबळ माजवली आहे. त्यातून ही जीन्सही एका मोठ्या ब्रॅण्डची आहे. (gucci grass stained jean which got popular with memes and its price)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या जीन्सवर खोटा डाग पाडला जातो जसे की डाय केल्याप्रमाणे हा डाग तुमच्या जीन्सवर दिसेल. आपण मळकटलेली किंवा फाटलेली जीन्स (Fake Stained Jeans) तर घालूच शकत नाही. त्यातून आपल्यासाठी अशी जीन्स घालून जाणं हे फारच अपमानास्पद होतं. परंतु आता फॅशन इंडस्ट्री ही बदलत जात आहे. त्यामुळे आता अशाप्रकारे खोटा डाग लावणं हे फॅशन करण्याचं लक्षण झालं आहे इतपत ही फॅशन बदलली आहे. त्यातून या एका जीन्सची किंमत जर का तुम्ही ऐकलीत तर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. यावर अशा पद्धतीनं खोटा डाग दाखवून तो खरा आहे असे भासवले जाते आणि ही जीन्स बाजारात विकली जाते. ज्याचे मुल्यही इतके आहे की त्यात तुम्ही आयफोनही घ्याल. 


गुची (Gucci) या जगप्रसिद्ध ब्रॅण्डनं ही जीन्स आणली आहे. सप्टेंबर 2020 दरम्यान या जीन्सची जोरदार चर्चा सुरू झाली होती. यावर तऱ्हेतऱ्हेचे मीन्सही निघाले होते. त्यामुळे सगळीकडून या फॅशनला खूप ट्रोलही करण्यात आले होते. ही जीन्स ऑरगॅनिक कॉटननं तयार केली आहे. या जीन्सची लेन्थही फार मोठी आहे. यावर ग्रास - स्टेन आहे जो मुद्दामून लावला गेलेला आहे. जी या जीन्सची फॅशन आहे. यावर या मोठ्या कंपनीनं सांगितले होती की, हा एक क्लट फॅब्रिकमधला प्रयोग आहे. विन्टेंज आणि समकालिन फॅशनमधील दूरी दूर करत नवीन तंत्र आणण्याचा हा प्रयत्न होता. 


इंटरनेटवरून मात्र ट्रोलर्सनी (Trolled) या फॅशनला पुष्कळ प्रमाणात ट्रोल केले होते त्यामुळे लोकांनी या गोष्टींलाही तितकेच उतरून धरले होते.



त्याचसोबतच गुचीनं उल्टा चष्मा आणूनही नवा फॅशन ट्रेण्ड विकसित केला होता. त्याचसोबतच या फॅशनमुळे नवनवीन तर्कवितर्कही काढण्यास सुरूवात झाली होती. परंतु असा ट्रेण्ड आणून गुचीनं एक नवा ट्रेण्ड मार्केटमध्ये आणला होता.