गुरुद्वारावर भ्याड दहशतवादी हल्ला
या हल्ल्याची माहिती मिळताच...
काबुल : बुधवारी अफगाणिस्तानची राजधानी असणाऱ्या काबुल येथे एका बंदुकधारी इसमाने आणि आत्मघाती हल्लेखोरांनी धर्मस्थळ असणाऱ्या एका गुरुद्वाऱ्यावर हल्ला केला. त्यांनी हल्ला केला त्यावेळी या ठिकाणी जवळपास 200जण अडकल्याची माहिती समोर आली. सध्याच्या घडीला समोर आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 11हून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे.
काबुल येथील या हल्ल्याची माहिती मिळताच अफगाणिस्तानच्या संरक्षण दलातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि हल्लेखोरांना प्रत्युत्तर दिलं. अफगाणिस्तानमधील शीख समुदायाचे नेते खासदार नरिंद्र सिंग खालसा यांच्या माहितीनुसार या हल्ल्यानंतर परिसरात एकत गोंधळ आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. ISIS या संघटनेकडून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली.
सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन आत्मघाती हल्लेखोरांनी धर्मशाळेत प्रवेश केला. तेथे सर्व श्रद्धाळू असतेवेळीच त्यातीच एका बंदुकधारी हल्लेखोराने हल्ला करण्यास सुरुवात केली.
हल्ल्याचा निषेध
महाराष्ट्र शीख असोसिएशय अर्थात एमएसए या संघटनेकडून काबुल येथे गुरुद्वारावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या काही फोटोमध्ये लहान मुलं सुरक्षा दलाच्या जवानांच्या मदतीने बाहेर येतानाा दिसत आहेत. यामधील काही मुलांच्या पायात चप्पलही नसून झाल्या प्रकारानंतर ती हादरलेली दिसून आली.
महाराष्ट्र शिख असोसिएशन याची निंदा करत असल्याचे समन्वयक बल मतकीत सिंग यांनी सांगितले. गुरुद्वारामध्ये दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला गेला. लहान मुलं, स्त्रिया कोणावरच दया दाखवली नाही. याचा आम्ही निषेध करतो. अफगाणिस्तान सरकारशी संपर्क करुन तिथल्या शिख बांधवांना सहाय्य करावे आणि दहशतवाद्यांना कठोर शिक्षा द्यावी असे आवाहन त्यांनी पंतप्रधानांना केले आहे.