दानपेटीत असं काही सापडलं की उडाली एकच खळबळ, बंद करावी लागली परिसरातील सर्व दुकानं
इंग्लंडच्या मॅनचेस्टरमधील शॉपिंग सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या दानपेटीत असं काही सापडलं की सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. याची माहिती मिळताच बस स्टेशन आणि शॉपिंग सेंटरमधील दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात आले.
इंग्लंडच्या मॅनचेस्टरमध्ये एका चॅरिटी शॉपमध्ये जे झालं त्यामुळे एकच खळबळ उडाली. येथील ऑर्केड शॉपिंग सेंटरमध्ये तयार करण्यात आलेल्या चॅरिटी शॉपच्या दानपेटीत एक गोष्टी सापडली ज्यामुळे सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. यानंतर घाबरलेल्या लोकांनी पोलिसांना फोन केला. याचं कारण दानपेटीत कोणीतरी चक्क हँड ग्रेनेड टाकला होता.
बॉम्ब सापडल्याची माहिती मिळताच शॉपिंग सेंटरमध्ये धावपळ सुरु झाली. बस स्टेशन आणि शॉपिंग सेंटरचे दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात आले. तसंच बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला बोलावण्यात आलं.
घटनास्थळी पोलिसांसह बॉम्ब स्क्वॉडही दाखल झाला होता. मॅनचेस्टर इवनिंग न्यूज रिपोर्टनुसार, तात्काळ परिसराला घेराव घालण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक दुकानं बंद करण्यात आली. ग्रेटर मॅनचेस्टर पोलिसांनी सांगितलं आहे की, हा ग्रेनेड धोकादायक नव्हता. तो एक ट्रेनिंग डिव्हाईस होता, जो कोणीतरी एका चॅरिटी दुकानासाठी ठेवण्यात आलेल्या बॅगेत ठेवला होता. याचा कोणालाही धोका नव्हता.
आर्केड शॉपिंग सेंटरने या घटनेला दुजोरा देत माहिती दिली आहे की, पूर्वकाळजी म्हणून तीन दुकानं बंद करण्यात आली होती. पण कार पार्किंग आणि सेंटरचा उर्वरित भाग खुलाच होता. ग्रेटर मॅनचेस्टर पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे की, "मंगळवारी 6 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी जवळपास 1 वाजून 15 मिनिटांनी अधिकाऱ्यांना वॉरिंग्टन स्ट्रीट येथे एका कमर्शिअल सेंटरमध्ये ग्रेनेड सापडल्याची माहिती मिळाली. बॉम्ब स्क्वॉड घटनास्थळी आहे, पण सध्या तरी त्याचा काही धोका नाही".
चॅरिटी शॉपमध्ये याआधीही अजब सामान आढळलं आहे. गतवर्षी कोणीतरी चॅरिटी शॉपमध्ये करोडोंच्या किंमतीचे बूट ठेवले होते.