दुबई : युएईमध्ये राहणार्‍या हरीकिशन या भारतीयाला तिसर्‍या प्रयत्नामध्ये कोटींची लॉटरी लागली आहे. हरिकिशन रातोरातो करोडपती झले आहेत. त्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. 


रातोरात करोडपती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर हरिकिशन यांना कोटींची लॉटरी लागली आहे. 'बडी तिकीट' लॉटरीमध्ये हरिकिशन यांना तिसर्‍या प्रयत्नामध्ये 12 लाख दिनार  म्हणजेच सुमारे  20.8 कोटींची लॉटरी लागली आहे. 


दुबईचे रहिवासी 


हरिकिशन 2002 सालापासून दुबईत राहतात. अबुधाबीतील सर्वात मोठ्या रक्कमेची लॉटरी हरिकिशन यांनी जिंकली आहे. 


अविश्वसनीय क्षण 


सुरूवातीला हरिकिशन यांना लॉटरी लागल्याच्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. हरिकिशन यांनी सुरूवातीला काही फोन कॉर्ल्सकडे दुर्लक्ष केले. मात्र हळूहळू रेडिओस्टेशन आणि मीडिया हाऊसमधून फोन यायला सुरूवात झाल्यानंतर मात्र या गोष्टीवर विश्वास बसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 


जिंकलेल्या रक्कमेचं काय करणार ? 


हरिकिशन यांनी जिंकलेली रक्कम 5 फेब्रुवारीला त्यांना मिळणार आहे. मात्र जिंकलेल्या रक्कमेचं नक्की काय करणार ? याबाबत काय करणार हे अजूनही ठरलेलं नाही.