ऑफिस लंच टाइममध्ये ठेवा शारीरिक संबंध, मूल जन्माला घाला अन् लाखो रुपये घेऊन जा! `या` देशात बनतंय `S*x मंत्रालय`
ऑफिसमधील लंच टाइम वाया न घालवता ऑफिसमध्ये शारीरिक संबंध ठेवा आणि मुलांना जन्म द्या असा सल्ला खुद्द इथल्या सरकारने म्हटलंय. एवढंच नाही तर यासाठी लाखो रुपये देणार असल्याच सांगितलंय.
Viral News : दिवसातील 9 ते 11 तास हे ऑफिसमध्ये जात असतात. त्यामुळे अनेक लव्ह अफेयर अगदी विवाह बाह्यसंबंध ऑफिसमध्ये होत असतात. आपल्या आजूबाजूला असे अनेक प्रकरण पाहिला मिळतात. खरं तर ऑफिसमध्ये कामाव्यतिरिक्त अशा प्रेम प्रकरणाला परवानगी नसते. अनेक ऑफिसमध्ये अशा प्रकरणाबद्दल नियम असतात. पण एका देशात ऑफिसमधील लंच टाइमही वाया घालू नका आणि त्या वेळेत शारीरिक संबंध ठेवा असा सल्ला दिलाय. कुठल्या देशातील सरकारने हा सल्ला दिला आहे आणि का? जाणून तुम्हाला धक्का बसेल.
या देशातील सरकारी कार्यालयातील अधिकारी आता मुलं जन्माला कसे येतील याबद्दल काम करत आहे. कारण रशियात मुलांचा जन्मदर कमी झाल्यामुळे त्यांनी अजब सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी ऑफिसमध्ये रोमान्स करण्यास सांगितलंय. त्यांच्या दुपारच्या जेवणाच्या वेळेचा वापर करून मूल जन्माला घालण्याचा सल्ला दिला आहे. एवढंच नाही तर मुलाला जन्म दिल्यावर त्यांना मोठी रक्कमही मिळणार आहे. रशियन सरकार हा मुद्दा इतका गांभीर्याने घेत आहे की ते यासाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करणार आहे.
जन्मदर वाढवण्यासाठी सरकारची धडपड
खरं तर, रशियामधील जन्मदर चिंताजनक पातळीवर कमी झाल्यामुळे ही परिस्थिती देशाच्या भविष्यासाठी चांगली नाही. त्यासाठी ऑफिसमधील लंच टाइमिंगमध्ये लैंगिक संबंध ठेवण्यास प्रोत्साहित केले जातंय. यातून मूल जन्माला आले तर तुम्हाला खूप मोठी रक्कम मिळेल. खरं तर, रशियन तरुण मुले जन्माला घालण्यात फारसा रस घेत नसल्यामुळे संपूर्ण रशिया चिंतेत आहे. त्यामुळे बाळंतपणाला चालना देणाऱ्या अशा योजना शासनस्तरावर केल्या जात आहेत. रशियन सरकार पहिल्या तारखेसाठी जोडप्यांना 5,000 रूबल (रु. 4,302) देईल. मुलाला जन्म दिल्यावर तुम्हाला 9.5 लाख रुपये मिळतील.
जन्मदर नीचांकी पातळीवर गेल्यामुळे...
रॉयटर्सच्या अहवालानुसार, रशियाचा जन्मदर एका चतुर्थांश शतकातील सर्वात कमी पातळीवर गेला आहे. रशियन मीडियानुसार, रशियामध्ये जन्मलेल्या मुलांची संख्या जूनमध्ये 6 टक्क्यांनी घटून 98,600 झाली आहे. मासिक जन्मदर 1,00,000 च्या खाली गेल्यावर हे प्रथमच घडले. देशाच्या भवितव्यासाठी हा विनाशकारी दिवस असल्याचे सरकारने स्पष्टपणे सांगितले.
स्वतंत्र 'S*x मंत्रालय' ?
जन्मदर वाढवण्यासाठी रशियामध्ये समर्पित 'S*x मंत्रालय' स्थापन करण्याच्या विचित्र प्रस्तावावरही विचार केला जातोय. रशियन मासिक मॉस्कविचच्या अलीकडील अहवालात म्हटलंय की अधिकारी या विचित्र प्रस्तावावर गंभीरपणे विचार करत आहेत. रशियामध्ये असेच मंत्रालय तयार केले जावे, जे देशभरात प्रणय, डेटिंग, लैंगिक संबंध आणि प्रजनन यावर जोरदार काम करेल यात आश्चर्य नाही.
घरी इंटरनेट बंद करा अन्...
द मिररच्या वृत्तानुसार, रशियन अधिकारी घरातही शारीरिक संबंधाला प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहेत. या अंतर्गत, लोकांनी रात्री 10 ते पहाटे 2 या वेळेत घरातील इंटरनेट, दिवे बंद करावे आणि आपल्या जोडीदाराशी जवळीक वाढवावी, जेणेकरून रशियाची लोकसंख्या वाढण्यास मदत होईल अशी सूचना केली जात आहे. जोडप्यांना त्यांच्या प्रेम सत्रात त्रास होऊ नये म्हणून इंटरनेट बंद करण्याची सूचना देण्यात आल्यात.