बुर्ज खलीफाचा `हा` Viral Video पाहिलात का? पाहून तुम्ही म्हणाल अद्भूत
त्यात त्या इमारतीचे अप्रतीम दृश्य कॅपचर केला आहे.
Dubai: तुम्हाला तर माहित असेलच जगातील सगळ्यात मोठी इमारत दुबईमध्ये आहे जिचे नाव बुर्ज खलीफा (burj khalifa) आहे. या इमारतीचे असंख्या व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. काहींचे व्हिडिओ भयान वायरल होतात तर काहींचे व्हिडिओ आपल्याला हैरान करुन सोडतात. तसंच ड्रोन पायलट आंद्रे लार्सन (Drone Pilot Andre Larsen) याने सुद्धा बुर्ज खलीफाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात काढला आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक ड्रोन बुर्ज खलीफाच्या वरपासून ते खालपर्यंत उडताना दाखवला आहे. त्यात त्या इमारतीचे अप्रतीम दृश्य कॅपचर केला आहे.
आणखी वाचा - हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, अन्यथा पोटदुखी आणि गॅसचा होईल त्रास
अंगावर शहारे येणारा तो व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की "तुम्ही जगातील सर्वात उंच इमारतीवरून पडत आहात. त्या व्हिडिओत इमारतीचा वरचा भाग आधी पाहायला मिळतो आणि मग हळूहळू ड्रोन खाली येताना दिसतो. त्या व्हिडिओत अतिशय सुंदर दृश्य टिपलं आहे. (Have you seen this Viral Video of Burj Khalifa nz)
हा व्हिडिओ ८ सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आला आहे. ही क्लिप पोस्ट केल्यापासून सोशल मीडियावर (Social Media) तूफान वायरल झाली आहे. आतापर्यंत,दोन दशलक्ष अधिक वेळा तो व्हिडिओ पाहिला गेला आहे आणि अजूनही लोक त्या व्हिडिओवर भरभरुन प्रेम करत आहेत. त्या व्हिडिओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स देखील आल्या आहेत.
आणखी वाचा - Work Stress : कामाचा तणाव ठरतोय धोकादायक, WHO चा हादरवणारा रिपोर्ट
एका इंस्टाग्राम यूजरने पोस्ट केले, "एपिक डायव्ह," दुसर्याने लिहिले, "पृथ्वीवरील सर्वोत्कृष्ट ड्रोन पायलट," तिसर्याने लिहिले, "आवडले," चौथ्याने लिहिले, "विलक्षण," अनेकांनी मनापासून किंवा टाळ्या वाजवून आपल्या प्रतिक्रिया दर्शवल्या.