Most Unique Business : एखादी छोटीशी कल्पना एखाद्या व्यक्तीचं नशीब बदलवून मेहनतीच्या जोरावर त्याला करोडपची बनवू शकते. असच एका शिक्षकासह घडलं आहे. अमेरिकेच्या एक व्यक्तीने शिक्षकाची नोकरी सोडली आणि त्याने कुत्र्यांना फिरवले (Dog Walker). यातूनच त्याला नवीन बिजनेस आयडीया सुचली (Most Unique Business). एका वर्षाच्या आत या शिक्षकाने 1 कोटींची कमाई केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा शिक्षक सध्या 'डॉग वॉकर' म्हणून काम करत आहे. त्याने कुत्रे फिरवण्याच नवा व्यवसाय सुरु केला आहे. त्याने स्वत:चा कंपनी स्थापन करुन कुत्रे फिरवण्यासाठी अनेकांना कामावर ठेवले आहे.  न्यूयॉर्क पोस्टने याबाबतचे वृत्त दिले आहे. मायकल जोसेफ असे या शिक्षकाचे नाव आहे.


मायकल जेव्हा  शिक्षकाची नोकरी करत होता तेव्हा त्यांची वार्षिक कमाई फक्त 30 लाख रुपये होती. परंतु शिक्षकाची नोकरी सोडून त्याने सुरु केलेल्या या नविन व्यवसायातून तो वर्षाला एक कोटींची कमाई करत आहे.   मायकल हा मूळचा अमेरिकेतील ब्रुकलिन शहरातील आहे. व्यवसायाने शिक्षक असलेल्या मायकल यांची 'डॉग वॉकर' अशी नविन ओळख निर्माण झाली आहे. 'डॉग वॉकर' या व्यवसायाच्या कमाईतून त्याने न्यू जर्सीमध्ये घर खरेदी केले आहे. याशिवाय त्याच्याकडे स्वतःची कार देखील आहे. 


कशी सुचली बिजनेस आयडीया?


2019 मध्ये मायकलने पार्ट टाईम डॉग वॉकर म्हणून काम केले. मायकल जेव्हा कुत्र्यांना उद्यानात फिरायला घेऊन जायचा तेव्हा तिथे येणारे इतर लोक नेहमी म्हणायचे की कुत्रे प्रत्येक गोष्टीत मायकेलची आज्ञा पाळतात. दरम्यान, एका व्यक्तीने विचारले त्याला गंमतीने विचारले की तु  कुत्र्यांना फिरवण्याचा काम का करत नाही? यानंतर मायकलला  'डॉग वॉकर'  बिजनेसची कल्पना सुचली. 


शिक्षकाची नोकरी सोडून  'डॉग वॉकर'  बनला


शिक्षकाची नोकरी सोडून मायकल  'डॉग वॉकर'  बनला. तो पूर्णवेळ कुत्रा फिरवण्याचे काम करु लागला. मायकलने पार्कसाइड पप्स नावाची कंपनी सुरु केली. यातुन त्याने लोकांची पाळीव कुत्री फिरवण्याचा व्यवसाय सुरु केला. अनेकांनी त्याच्या कंपनीकडून सर्व्हिस घेतली. मायकल याने आपल्या कंपनीत अनेकांना जॉब दिला आहे. हे सर्वजण मायकलसोबत कुत्रा फिरवण्याचे काम करतात.  


अनेक डॉग लव्हर मायकलचे क्लाईंट आहेत. अनेकजण कुत्रे पाळतात. मात्र, बिझी शेड्यूलमुळे या कुत्र्यांना घराबाहेर फिरवणे त्यांना जमत नाही. अशा लोकांच्या कुत्र्यांना मायकल बाहेर तसेच गार्डनमध्ये फिरवून आणतो. मायकलने आपल्या कंनीचे App देखील तयार केले आहे. या Appच्या माध्यमातून अनेक जण त्याची सर्व्हिस घेतात. मायकलची कंपनी फक्त कुत्र्यांना फिरवतच नाही तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग देखील देते. मायकल डॉग वॉकिंगसाठी प्रति तास 2000 ते 2500 रुपये शुल्क आकारतो. तर, कुत्र्यांना ट्रेनिंद देण्यासाठी तो प्रति तास  5 हजार रुपये घेतो.  एका रात्रीसाठी कुत्रा पाळण्यासाठी तो 5200 रुपये  चार्जेस घेतो.