VIDEO : नदीही अडवू शकली नाही रस्ता; लसीकरणासाठी हेल्थ वर्करची जिद्द
मुसळधार पावसातही नदी पार करत लसीकरणाची जबाबदारी पार पाडली
मुंबई : देशभरात कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी जगभरात प्रतिबंधात्मक लसीकरणाचं अभियान सुरू आहे. काही राज्यात अगदी घरोघरी जाऊन कोविड-19 प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. अगदी गावात कमी लोकवस्ती असली तरीही हेल्थ वर्कर आपलं काम नित्य नियमाने करत आहे. (Health workers cross a river to carry out door-to-door COVID19 vaccination in Rajouri district) हेल्थ वर्कर कोणत्याही परिस्थितीत आपलं काम करत आहे. अगदी निसर्गाचं रौद्र रुपही त्याला थांबवू शकलेलं नाही. हा संपूर्ण प्रकार एका व्हि़डीओत कैद झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील हा व्हिडीओ आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, अगदी मुसळधार पावसात हे हेल्थ वर्कर नदी पार करत आहेत. हा कोणत्याही पर्यटकांचा व्हिडीओ नाही. तर हेल्थ वर्करचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे.
व्हिडीओत काही महिला हेल्थ वर्कर दिसत आहेत. ज्या मुसळधार पावसात नदी पार करण्यासाठी पुरूष सहकर्मचाऱ्यांची मदत घेत आहे. हा व्हिडीओ राजौरीमधील त्राला गावातील आहे. हा व्हिडीओ त्राला स्वास्थ केंद्राचे प्रभारी डॉ. इरम यास्मीन यांनी एएनआयला दिला आहे.
जम्मू काश्मिरमध्ये शुक्रवारी कोविड-19 चे 261 नवे रूग्ण आढळळे. यानंतर आतापर्यंत संक्रमित झालेल्या रूग्णांचा आकडा 3,18,284 झाला आहे. तसेच एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आता मृतांचा आकडा हा 4,354 झाला आहे.