Heligan Pineapple: जगातील महागड्या अननसाच्या प्रजातीबाबत माहिती आहे का? किंमत ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
Heligan Pineapple: आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या अननसाबाबत सांगणार आहोत. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, हेलिगन अननस हे इंग्लंडमधील कॉर्नवॉलमध्ये पिकवलं जातं. एका अननसाची किंमत सुमारे 1,000 पौंड स्टर्लिंग (1 लाख रुपये) आहे. एक पीक तयार होण्यासाठी सुमारे दोन ते तीन वर्षे लागतात.
Heligan Pineapple: अननस एक फळ असून यात मुबलक प्रमाणात पोषक तत्व आढळतात. भारतात आसाम, त्रिपुरा, मेघालय, केरळ, बंगाल आणि महाराष्ट्रात अननसाची लागवड केली जाते. या पिकासाठी 20 ते 30 अंश तापमान आणि हवामानात आर्द्रता असावी लागते. अननसाचे औषधी गुणधर्मही आहेत. अननसात व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि मॅंगनीज आणि पोटॅशियम सारखी खनिजं असतात. विशेषत: हिवाळ्यात हे फळ आरोग्यासाठी उत्तम आहे. अननस खाल्ल्याने जास्त भूक लागते, ताप असताना खाल्ल्यास ताप कमी होतो. लघवीतील जळजळ कमी होते. तसेच हाडे मजबूत करण्यास मदत करते. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या अननसाबाबत सांगणार आहोत. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, हेलिगन अननस हे इंग्लंडमधील कॉर्नवॉलमध्ये पिकवलं जातं. एका अननसाची किंमत सुमारे 1,000 पौंड स्टर्लिंग (1 लाख रुपये) आहे. एक पीक तयार होण्यासाठी सुमारे दोन ते तीन वर्षे लागतात.
वाढण्यासाठी ही विशेष पद्धत वापरणे
एका वेबसाइटनुसार, अननस 1819 मध्ये ब्रिटनमध्ये आणले गेले होते. लवकरच बागायतदारांच्या लक्षात आले की, देशातील हवामान अननस लागवडीसाठी चांगले नाही. म्हणून, त्यांना एक कल्पना सुचली. विशेष लाकडी खड्ड्याच्या आकाराची भांडी तयार करून आणि कुजलेल्या खताचा पुरवठा आणि त्याला खायला देण्यासाठी एक बॅकअप हीटर जोडून हवामान पुरक केलं. उष्णतेमुळे हवा गरम होते जी भिंतीतील छिद्रांद्वारे खड्ड्यांमध्ये प्रवेश करते. रिपोर्टनुसार, हेलिगनच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'अननस खूप मेहनतीने पिकवले जातात. अननसाची काळजी घेण्यासाठी लागणारा वेळ, खत, वाहतूक खर्च, अननसाची देखभालीमुळे प्रत्येक अननसाची किंमत आम्हाला £1,000 पडते.'
बातमी वाचा- Car Loan: कार लोन घेताना 20-10-4 चं सूत्र लक्षात ठेवा! कर्ज लवकर फिटेल
किंमत 10 लाखांपर्यंत जाऊ शकते
हेलिगन वेबसाइटनुसार, राणी एलिझाबेथ II यांना व्हिक्टोरियन ग्रीनहाऊसमध्ये उगवलेले दुसरे अननस भेट देण्यात आले. या फळाचा लिलाव झाल्यास प्रत्येक अननसाची किंमत 10 लाखांपर्यंत असू शकते, असे उद्यान अधिकाऱ्यांनी सांगितले.