Henley Passport Index 2024 News In Marathi : जगभरात 2024 मध्ये कोणत्या देशाचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली आहे? या संदर्भातील अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या यादीमध्ये सर्व शक्तिशाली पासपोर्ट असणाऱ्या देशांची नावे आहेत.  शक्तिशाली पासपोर्ट असण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये नुकतेच हेन्ली पासपोर्ट इंडेक्सने सादर केलेल्या अहवालानुसार अमेरिका-इस्त्रायल नव्हे तर फ्रान्स हा देश अव्वल स्थानावर आहे. तर दुसरीकडे सर्वात शक्तिशाली पासपोर्टमध्ये अमेरिका असे म्हटले जाते, परंतु सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या बाबतीत अमेरिका सातव्या क्रमांकावर आहे. आणि पासपोर्ट यादीत भारत 85 व्या क्रमांकावर आहे. तसेच पाकिस्तान या यदित खालून चौथ्या स्थानावर आहे. तर चीन 70 व्या क्रमांकावर आहे. हेन्ली पासपोर्ट इंडेक्सने सादर केलेल्या यादीत भारताचा क्रमांक घसरला असल्याचे दिसून आले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेन्ले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताच्या क्रमवारीत एका स्थानाने घसरले आहे. गेल्या वर्षी भारत 84 व्या क्रमांकावर होता. मात्र आता भारत 85 व्या स्थानावर आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. कारण गेल्या वर्षी भारतीय नागरिक 60 देशांमध्ये व्हिसाशिवाय स्थलांतर करू शकत होते, या वर्षी ही संख्या 62 वर आली. तरीही भारताच्या क्रमवारीत घसरण झाली आहे.  काही दिवसांपूर्वी इराणने भारतीय पर्यटकांना 15 दिवसांसाठी व्हिसा फ्री एंट्री देण्याची घोषणा केली होती. तसेच मलेशिया, थायलंड आणि श्रीलंकेतील नागरिक किंवा भारतीय नागरिकांसाठी व्हिसा फ्री एंट्री जाहीर केली असती. भविष्यात, इतर काही देशांतील भारतीय पर्यटकांना व्हिसा मुक्त प्रवेश देऊन भारताची क्रमवारी सुधारली जाऊ शकते. जर आपण पाकिस्तानच्या रँकिंगबद्दल बोललो तर ते गेल्या वर्षीप्रमाणे 106 व्या स्थानावर आहे. बांगलादेश 102 व्या क्रमांकावर आहे. तसेच मालदीवचा पासपोर्ट 58 व्या क्रमांकावर आहे.


तर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 च्या क्रमवारीत फ्रान्ससोबत जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन अव्वल स्थानावर आहेत. या सर्व देशांचे नागरिक व्हिसाशिवाय 194 देशांमध्ये प्रवेश करू शकले. फिनलंड, दक्षिण कोरिया आणि स्वीडन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर ऑस्ट्रिया तिसऱ्या स्थानावर आहे. या रँकिंगचा फायदा अमेरिका आणि चीनला झाला आहे. गेल्या वर्षी अमेरिका सातव्या क्रमांकावर असती, पण आता ती सहाव्या क्रमांकावर आहे. चीन गेल्या वर्षी 66व्या क्रमांकावर होता, पण आज 64व्या क्रमांकावर आहे. दरम्यान, अफगाणिस्तान शेवटच्या स्थानावर आहे. तालिबानच्या मालकीच्या राज्यांच्या देशांतील नागरिकांना 28 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश मिळतो. होय, 


पासपोर्ट इंडेक्स म्हणजे काय? 


परदेशात जाणे ही सर्वात महत्त्वाची असली तरी कोणत्या देशाचा पासपोर्ट किती शक्तिशाली आहे हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. पासपोर्ट धारक व्हिसा घेतल्याशिवाय किती देशात प्रवास करु शकतो यावर अवलंबून आहे. यामध्ये फ्रान्सने पहिला क्रमांक पटकावला आहे. कोणत्याही देशासाठी मजबूत पासपोर्ट रँकिंग महत्त्वाची असते कारण त्या देशाचे नागरिक व्हिसाशिवाय जगभर प्रवास करू शकतात की नाही हे ठरवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. म्हणजेच सोयीनुसार, इतर देशांचे वैध पासपोर्ट असलेल्या देशातील नागरिकांना प्रवेशाची सुविधा उपलब्ध आहे. हे रँकिंग आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या डेटावर आधारित आहे.