खरंच भूतांनी बनवलंय हे आलिशान हॉटेल? जे केवळ Google Maps वरच दिसतं
विशेष म्हणजे ही इमारत फक्त गुगल मॅपवरच दिसते. तर प्रत्यक्षात त्या ठिकाणी अशी कोणतीही इमारत नाही.
मॅंचेस्टर : भूतांबद्दल लोकांची वेगवेगळी मतं आहेत. काही लोक भूतांवर विश्वास ठेवतात तर काही लोक त्यांना केवळ भ्रम मानतात. भूत दिसल्याचा दावा अनेकांनी केला आहे. यासोबतच काही लोकांनी त्यांच्यासोबत भयानक अनुभवही शेअर केलेत. मँचेस्टरमधील लोकांना भुताच्या जगाचे पुरावे मिळाले असले तरी, हा पुरावा त्यांनी गुगल मॅपवर मिळवला.
वास्तविक सोशल मीडियावर काही फोटो शेअर करण्यात आली होती, ज्यामध्ये काही आलिशान इमारत दिसत होती. विशेष म्हणजे ही इमारत फक्त गुगल मॅपवरच दिसते. तर प्रत्यक्षात त्या ठिकाणी अशी कोणतीही इमारत नाही.
वास्तवात ही इमारत नाहीच
किंबर्ली या ट्विटर युजरने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये गुगल मॅपवर मँचेस्टर ब्रिज स्ट्रीट आणि स्थानिक मॅजिस्ट्रेट कोर्टाजवळील लोरी हॉटेलजवळ अनेक आलिशान इमारती दिसत होत्या. या इमारतींना Weird Phantom Buildings असं नाव देण्यात आले. गुगल मॅपवर दिसणार्या या इमारती भितीदायक असून प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचंही सांगण्यात आलंय.
रहस्यमयी बिल्डींग
गुगल मॅपवर या रहस्यमयी इमारती पाहिल्यानंतर अनेकांनी या इमारतींना दुसऱ्या जगाचं डायमेंशन असल्याचं म्हटलंय. या इमारती फक्त गुगल मॅपवरच पाहता येतात. मँचेस्टरमध्ये अशा इमारती किंवा भुताटकीच्या घटना पाहण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही यूएफओपासून एलियनपर्यंत पाहिल्याचा दावा करण्यात आला आहे.
लोकांनी शेअर केले त्यांचे अनुभव
यानंतर अनेकांनी त्यांचं असेच काहीसे अनुभव शेअर केलेत. अनेकांनी भूत पाहण्याचा तर कधी UFO पाहण्याचा उल्लेख केला आहे. या ठिकाणी राहणाऱ्या डेव्ह नावाच्या व्यक्तीने सांगितले की, तो 70 च्या दशकापासून अलौकिक गोष्टी पाहतो आणि ऐकतो. मँचेस्टरमध्ये काहीतरी आहे, ज्याचं रहस्य उघड झाले नाही.