अमेरिका अध्यक्षीय निवडणुकीत आता हिंदुत्वाचा मुद्दा
अमेरिकेत अध्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. ३ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होत आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेत अध्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. ३ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होत आहे. 'हिंदू अमेरिकन फॉर बायडेन' अशी मोहिम सुरु आहे. तीन वेळा डेमोक्रॅटिक पक्षाकडून राजा कृष्णमूर्ती इलिनॉय प्रातांतून काँग्रेस सदस्य राहिले आहेत. त्यांनी हिंदू समाजाला संबोधित करताना डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ज्यो बायडेन आणि त्यांच्या सहयोगी कमला हॅरिस यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, आता या निवडणुकीत हिंत्वाचा मुद्दा पुढे आला आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतही आता हिंदुत्वाचा मुद्दा जोर धरू लागल्याचं चित्र आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरीस यांचं एक पोस्टर वादाच्या भोवऱ्यात अडकलंय. या पोस्टरमध्ये हॅरीस दुर्गामातेच्या रुपात आहेत आणि त्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा चेहरा असलेल्या महिषासुराचा वध करत आहेत, असं दाखवण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक अवघ्या दोन आठवड्यांवर आली असताना अमेरिकेतील हिंदू मतदारांमध्ये उभी दुफळी पडल्याचं चित्र आहे.
ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या हिंदू समर्थकांमध्ये या पोस्टरवरून चांगलीच जुंपली आहे. ट्रम्प यांचे समर्थक बायडेन हे मुस्लिमांचे तुष्टीकरण करणारे असल्याचं सांगत आहेत. पाकिस्तानने बायडेन यांना 'हिलाल ए पाकिस्तान खिताब' दिल्याचा हवाला त्यासाठी दिला जात आहे. दुसरीकडे डेमोक्रॅटिक हिंदू मात्र ट्रम्प हे वर्णवादी असल्याची टीका करतायत. नजिकच्या काळात कृष्णवर्णीय नागरिकांबाबतच्या घटनांचा दाखला दिला जात आहे.