हिटलरच्या `हाफ पॅन्ट`ला मिळणार लाखो रूपये...
जर्मनीचा हुकूमशाहा म्हणून ओळखला जाणारा अॅडॉल्फ हिटलर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या वेळी त्याचे चर्चेत येणे हे काहीसे हटके कारणामुळे आहे. अमेरिकेत होणाऱ्या एका लिलावात चक्क हिटलरच्या बॉक्सर शॉर्ट्सची (हाफ पॅन्ट) बोली लागणार आहे.
न्यूयॉर्क : जर्मनीचा हुकूमशाहा म्हणून ओळखला जाणारा अॅडॉल्फ हिटलर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या वेळी त्याचे चर्चेत येणे हे काहीसे हटके कारणामुळे आहे. अमेरिकेत होणाऱ्या एका लिलावात चक्क हिटलरच्या बॉक्सर शॉर्ट्सची (हाफ पॅन्ट) बोली लागणार आहे.
हिटलरच्या या हाफ पॅन्टला ५,००० अमेरिकी डॉलर (भारतीय रूपयांत सुमारे ३,१९,८०० लाख रूपये) इतकी बोली लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेच्या अलेक्झांडर हिस्टॉरिकल ऑक्शन्सने दिलेल्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाची ही हाफ पॅन्ट काहीशी हटके आहे. तीची लांबी १९ इंचाची असून, कमरेतील जाडी ३९ इंचाची आहे. या पॅन्टवर हिटलरच्या नावाची आद्याक्षरे 'ए.एच' सुद्धा आहेत.
हिटलरची ही हाफ पॅन्ट ऑस्ट्रियाच्या पार्कहोटल ग्राज या हॉटेलमध्ये राहिली होती. १९३८ मध्ये हिटलर या हॉटेलमध्ये राहिला होता. प्रतिज्ञापत्रात लिहिलेल्या माहितीनुसार, या हाफ पॅन्टचा लिलाव करणारा व्यक्ती हा पार्कहोटल ग्राज हॉटेलच्या मालकाचा नातू आहे. हिटलरने ३ ते ४ एप्रील १९३८ या कालावधी या हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला होता.
दरम्यान, हिटलरच्या आत्मचरित्राच्या हस्तलिखीताची दुर्मिळ प्रतही या लिलावात ठेवण्यात येणार आहे. हा लिलाव ऑनलाईन पद्धतीने होणार असून, १३ सप्टेबरपासून या लिलावास सुरू वात होईल.