Pope Francis on Homosexuality: समलैंगिक संबंध (Homosexual) या विषयावर कॅथलिक चर्चच्या पारंपारिक भूमिकेला फाटा देणारी भूमिका पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांनी मांडली आहे. आपल्या ऐतिहासिक भूमिकेसंदर्भात बोलताना पोप फ्रान्सिस यांनी, "समलैंगिकता (होमोसेक्शुएलिटी) हा गुन्हा नाही," असं म्हटलं आहे. कॅथलिक चर्चेचे प्रमुख असलेल्या पोप फ्रान्सिस यांनी मांडलेली ही भूमिका अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे. 'असोसिएट प्रेस' या वृत्तसंस्थेशी बोलताना पोप फ्रान्सिस यांनी हे विधान केलं आहे.


अनेक बिशप्स समर्थन करत असल्याचं केलं मान्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोप फ्रान्सिस यांनी समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारे कायदे आणि नियम हे अन्यायकारक असल्याचं म्हटलं आहे. इतक्यावरच न थांबता पोप फ्रान्सिस यांनी एजीबीटीक्यू घटकातील सदस्यांना चर्चमध्ये प्रवेश देण्याच्या निर्णयाचं स्वागत करणाऱ्या बिशप आणि पाद्रींना पाठिंबा दिला आहे. पोप फ्रान्सिस यांनी जगातील काही देशांमध्ये कॅथलिक बिशप्स समलैंगिकतेचा गुन्हा ठरवणाऱ्या कायद्यांचं आणि एलजीबीटीक्यू समाजातील लोकांशी दुजाभाव करणाऱ्या कायद्याचं समर्थन करत असल्याची वस्तूस्थिती मान्य केली आहे. त्यांनी या विषयासंदर्भात 'पाप' हा शब्द वापरला. मात्र अशाप्रकारे बिशप्सकडून मिळत असलेला पाठिंबा हा संस्कृतिक पार्श्वभूमीवर आधारित असतो. मात्र आता बिशप्सने आपली विचारसणी बदलून सर्वांच्या प्रतिष्ठेचा सन्मान करणं शिकलं पाहिजे, अशी अपेक्षाही पोप फ्रान्सिस यांनी व्यक्त केली.


संवादाचा मार्ग स्वीकारावा


"या बिशप्सने संवादाचा मार्ग स्वीकारला पाहिजे. ज्या प्रकारे देव आपल्या सर्वांबद्दल हळूवारपणे आणि नाजूकपणे विचार करतो तोच मार्ग त्यांनी हा विषय हाताळताना वापरला पाहिजे," असंही पोप फ्रान्सिस म्हणाले. समलैंगिकतेला गुन्हा ठरवणं हे अयोग्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी कॅथलिक चर्चेने हा प्रकार संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करावा असंही म्हटलं आहे. "आपण सर्वांनी हे करायला हवं," असं त्यांनी हे कायदे कालबाह्य करण्यासंदर्भात म्हटलं. 


आपण फरक स्पष्ट केला पाहिजे


समलैंगिकतेसंदर्भातील गुन्हे आणि पाप अशा दोन गोष्टी वेगळ्या ठोस व्याख्येनुसार निश्चित करण्याची गरज असल्याचंही पोप फ्रान्सिस यांनी म्हटलं आहे. "समलैंगिक असणं हा काही गुन्हा नाही. हा गुन्हा नाही पण हे पाप आहे. मात्र आपण पाप आणि गुन्हा यामध्ये फरक स्पष्ट केला पाहिजे," असं पोप फ्रान्सिस म्हणाले. "एकमेकांशी दयाळूपणे न वागणं हे सुद्धा पाप आहे," असंही ते म्हणाले. 


यापूर्वीही पोप यांनी घेतलेली भूमिका


पोप फ्रान्सिस हे पुरोगामी विचारसणीचे असून त्यांनी यापूर्वीही एलजीबीटीक्यू समुदायाला पाठिंबा दर्शवला आहे. अनेकदा त्यांनी याबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे.