व्हिक्टोरिया : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान हाँगकाँगमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे किमान 2000 हॅमस्टर (उंदीरासारखा प्राणी) कोरोना संसर्ग झाला आहे. हाँगकाँग प्रशासनाने सांगितले की सर्व संसर्ग झालेल्या उंदरांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाळीव प्राण्यांच्या दुकानात अनेक हॅमस्टरला कोविड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.  स्टोअरमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी काम करत होता, त्यामुळे उंदरांनाही संसर्ग झाल्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्राण्याच्या आयात-निर्यातीवरही प्रशासन बंदी घालणार आहे. सोमवारी केलेल्या तपासणीत पाळीव प्राण्यांच्या दुकानातील एका कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर प्राण्यांची चाचणी करण्यात आली.. दरम्यान, प्राण्यांपासून मानसांना संसर्ग होण्याचे कोणतेही पुरावे प्रशासनाला मिळालेले नाहीत. तरी खबरदारीची उपाययोजना म्हणून 7 जानेवारी नंतर खरेदी केलेल्या सर्व हॅमस्टरला मारण्यात येणार आहे.


प्रशासनाचे जनतेला आवाहन
लोकांनी संबंधित दुकानातून हॅमस्टर विकत घेतले असतील तर, ते स्थानिक अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे आवाहन प्रशासनाने दिले आहे. तसेच सर्व स्टोअरमध्ये हॅमस्टरची विक्री थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 22 डिसेंबरपासून पाळीव प्राण्यांच्या दुकानातून हॅमस्टर खरेदी करणाऱ्यांनाही अनिवार्यपणे कोविड-19 चाचणी करावी लागेल आणि या लोकांना अहवाल येईपर्यंत आयसोलेशनमध्ये राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.