Trending Video: माणसांप्रमाणे प्राण्यांमध्येही भावना असतात. त्यांनादेखील चांगल्या-वाईट गोष्टीची समज असते. मुके प्राणीही माणसांप्रमाणेच भावना व्यक्त करु शकत नसले तरी त्यांच्यातही भावना असतात. आता काळ बदलल्याने जंगलं नाहिशी झाले आहेत. क्रॉक्रिंटीकरणामुळं जंगलं नाहीशी होत आहेत. अशातच जर आपण प्राण्यांच्या अधिवाशात प्रवेश केल्यास ते आक्रमक होतात. मात्र, कधी कधी असंही होत की प्राणी मानवाची मदत करतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात गोरिलाने 5 वर्षांच्या चिमुकल्याचे प्राण वाचवले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

sachkadwahi नावाच्या एका इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने म्हटलं आहे की, हा व्हिडिओ 31 ऑगस्ट 1986 सालातील आहे. जर्सी येथील झूमध्ये एक कुटुंब त्यांच्या 5 वर्षांच्या मुलासोबत फिरण्यासाठी आला होता. लेवान मेरिट असं या मुलाचं नाव आहे. लेवान मेरिट बेशुद्ध होऊन गोरिलाच्या पिंजऱ्यात पडला. त्यानंतर पिंजऱ्यात असलेल्या गोरिलाने बेशुद्ध पडलेल्या या मुलाला हानी पोहोचवण्याऐवजी त्यांची रक्षा केली. पिंजऱ्यात असलेले इतर गोरिला आणि लेावानच्यामध्ये भिंत म्हणून उभा ठाकला. तसंच, इतर गोरिलांना त्याला इजा करण्यापासून रोखले. त्यानंतर या चिमुकल्याच्या पाठीवरुन प्रेमाने हात फिरवून प्रेमही दाखवले. 



लेवान मेरिट पिंजऱ्यात असताना शुद्धीवर आला व त्याच्याबाजूलाच महाकाय गोरीलाला पाहून तो घाबरला. लेवान थरथर कापत असलेला या व्हिडिओत दिसत आहे. घाबरलेल्या लेवानला धीर देण्यासाठी गोरिलाना त्याच्या पाठीवरुन मायेने हात फिरवला. गोरिलाचा हा अंदाज पाहून अनेकांना गहिवरुन आले. मुक्या प्राण्यांनाही भावना असतात हे यावरुनच दिसून येते. इन्स्टाग्रामवर आत्तापर्यंत हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. तर, काही युजर्स मनाला भिडणाऱ्या प्रतिक्रिया देत आहेत. 


इन्स्टाग्रामवर अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. एका युझरने म्हटलं हात जोडणारी इमोजी दिली आहे. त्यासोबतच म्हटलं आहे की, देवाने घडवलेला सर्वात चांगला जीव. तर, अन्य एका व्यक्तीने म्हटलं आहे की, प्राण्यांकडे ही हृदय आहे. तिसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की, किंग काँग खरंच वास्तवात आहे.