मुंबई : चित्रपट हा मनोरंजनचा सगळ्यात मोठा स्त्रोत आहे. प्रत्येक चित्रपटाची एक वैशिष्ट असतं. कधी कोणाची पटकथा कधी दिग्दर्शन तर कधी गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. तर असे काही चित्रपट आहेत जे त्यांच्या रहस्यांसाठी ते ओळखले जातात. अटूक (Atuk) असे या हॉलिवूड चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाची एक वेगळीच कथा आहे. (Cursed Movie) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर, या चित्रपटात नायकाची भूमिका करण्यासाठी स्क्रिप्ट ज्याने वाचली त्याचा मृत्यू झाला. तुमचा यावर विश्वास बसणार नाही किंवा तुम्ही याला योगायोग म्हणू शकता. मात्र चित्रपटसृष्टीने एकामागून एक मृत्यू पाहिल्यावर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. स्क्रिप्टची सुरुवात कॅनेडियन लोककथेने होते. 


कोणत्या अभिनेत्यांच्या झाला मृत्यु


लोककथेनुसार, एक मुलगा अलास्कामध्ये नुकत्याच आलेल्या एका मुलीच्या प्रेमात पडतो. मुलगा तिच्या मागे न्यूयॉर्कला पोहोचतो आणि श्रीमंत माणूस बनतो. पण तो त्या मुलीच्या प्रेमात इतका वेडा झाला आहे की तो सर्वस्व गमावून मरतो. या गाण्यावर एक कादंबरी (The Incomparable Atuk) देखील लिहिण्यात आली आहे. यानंतर दिग्दर्शक नॉर्मन ज्यूसन यांनी पटकथा लेखक टॉड कॅरोल यावर चित्रपटाची पटकथा लिहिण्यास सांगितले. ही चित्रपटकथा लिहिण्यासाठी सुमारे 2 वर्ष लागली. कॉमेडियन अभिनेता जॉन बेलुशीनं स्क्रिप्ट वाचल्यानंतर काही दिवसांनी एका हॉटेलमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे त्याचा मृत्यू झाला. (horror mystery cursed movie script atuk 6 people actors died known as haunted hollywood real story) 


यानंतर कॉमेडियन अभिनेता सॅम किनिसनचा (Sam Kinison) कार अपघातात मृत्यू झाला.  जॉन कॅंडीचा हॉटेलमध्ये संशयास्पद अवस्थेत झालेला मृत्यू यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. याशिवाय स्क्रिप्ट देणारी व्यक्ती मायकल ओ डोनोगी (Michael O'Donoghue) देखील मृत्यूच्या कचाट्यात आली. असे मानले जाते की ख्रिस फार्ले आणि जॉन हार्टमन हे दोन्ही अभिनेते या शापित स्क्रिप्ट (Damned Script) वाचल्यामुळे मरण पावले. या चित्रपटाचा प्रोजेक्ट कायमचा बंद करून ही शापित स्क्रिप्ट लपवण्यात आली.