Viral Video: हॉट एअर बलून (Hot Air Balloon) हवेत असतानाच आग लागून दुर्घटना झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मेक्सिकोत (Mexico) झालेल्या या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. हॉट एअर बलूनला आग लागल्याने प्रवाशांनी तब्बल 50 ते 100 फुटांवरुन खाली उड्या मारल्या. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी बलूनमधून उड्या मारल्या. आगीत एक मुलगा भाजला अंसून गभीर इजा झाली आहे. त्याचा चेहरा आणि इतर ठिकाणी भाजलं आहे. तसंच हात फ्रॅक्चर झाला आहे. दरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून यामध्ये एक 39 वर्षीय महिला आणि 50 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. त्यांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. 


ट्विटरला या दुर्घटनेचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, यामध्ये हवेत असतानाच हॉट एअर बलूनला आग लागल्याचं दिसत आहे.



मेक्सिकोममधील अनेक टूर ऑपरेटर्स Teotihuacan वरुन हॉट एअर बलूनने सफर करण्यासाठी ऑफर देतात. यासाठी 150 डॉलर्स आकारले जातात.


सूर्य आणि चंद्राचे पिरॅमिड्स आणि त्याचा अव्हेन्यू ऑफ द डेड सह, Teotihuacan हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. कोलंबियन पूर्व काळातील हे एक जिवंत स्मारक आहे.