हॉटेलच्या रूममधील जोडप्यांचा प्रायवेट व्हिडीओ गार्डकडून शूट, तक्रार करताच समोर आली धक्कादायक गोष्ट
खरंतर आधी हा व्यक्ती कोण आहे हे त्यांना माहित नव्हते. परंतु नंतर तो व्यक्ती हॉटेलचा गार्ड असल्याचे कळाले.
स्पेन : लग्नानंतर बहुतांश सगळी जोडपी ही हनिमूनला जातात. जेथे ते प्रेमाचे आणि एकत्र क्षण घालवतात. एकत्र फिरताता आणि निसर्गाचा आनंद घेतात. परंतु हे क्षण जर कोणा तिसऱ्यामुळे खराब झाले तर? हे कोणीही सहन करु शकणार नाही. परंतु एका जोडप्यासोबत असा प्रकार घडला आहे. हा प्रकार फारच धक्कादायक आहे. खरंतर स्पेनला गेलेल्या एका जोडप्याने तिथल्या एका प्रसिद्ध हॉटेलवर गंभीर आरोप केले आहेत. या जोडप्याचे म्हणणे आहे की जेव्हा ते हॉटेलच्या खोलीत रोमान्स करत होते, तेव्हा एका व्यक्तीकडून त्यांचे हे खाजगी क्षण त्याच्याकडून रेकॉर्ड करण्यात आले.
खरंतर आधी हा व्यक्ती कोण आहे हे त्यांना माहित नव्हते. परंतु नंतर तो व्यक्ती हॉटेलचा गार्ड असल्याचे कळाले. जेव्हा या जोडप्याने या गार्डची हॉटेलच्या मॅनेजमेंटकडे तक्रार करण्यात आली, तेव्हा हॉटेलकडून जोडप्याला जे उत्तर मिळालं, त्याने या जोडप्याला चक्रावून सोडलं.
खोलीच्या दारावर सावली
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये राहणारी 28 वर्षीय अबीगेल हिगसन आपला पार्टनर उसामा काझीसोबत स्पेनमध्ये सुट्टी साजरी करण्यासाठी गेली होती. त्यांनी एका नामांकित हॉटेलमध्ये रूम बुक केली. समुद्र किनारी बांधलेल्या हॉटेलच्या खोलीत ती जोडीदाराशी रोमान्स करत असताना तिची नजर दाराकडे गेली. तिला दारावर कोणाची तरी सावली दिसली.
तेव्हा अबीगेल हळूच दाराजवळ गेली आणि तिने हळूच दरवाजा उघडला आणि तिथे एक व्यक्ती हातात मोबाईल घेऊन उभी असलेली दिसली. त्या व्यक्तीने त्या दोघांचे वैयक्तिक क्षण रेकॉर्ड केल्याचा आरोप अबीगेलने केला आहे.
अबीगेलच्या म्हणण्यानुसार, तिने आधी त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो धावू लागला. काही अंतरापर्यंत हे जोडपे त्याचा पाठलाग करत होते परंतु तो व्यक्ती काही त्यांच्या हाती लागला नाही. ही व्यक्ती हॉटेलचा सुरक्षा रक्षक असल्याचे अबीगेलला समजल्यानंतर तिने याबाबत हॉटेल मॅनेजमेंटकडे तक्रार केली.
त्यावेळी हॉटेलच्या मॅनेजमेंटनी तो गार्ड दारूच्या नशेत असल्याचे सांगून हे प्रकरण तेथेच दाबण्याचा प्रयत्न केला. यावरून हॉटेल कर्मचारी आणि व्यक्तीमध्ये वाद झाला. एकतर त्या गार्डने जे कृत्य केलं, त्याला या मॅनेजमेंटने गांभीर्याने घेतलं नाही. शिवाय त्यांचा कर्मचारी ड्यूटीवर असताना दारू प्यायला हे त्यांनी कसं सहन केलं, असा प्रश्न या जोडप्याला पडला.
या गार्डच्या असं कृत्य करण्यामागे संपूर्ण हॉटेल मॅनेजमेंटचा देखील हात असण्याची शक्यता आहे.
हे सगळं प्रकरण घडल्यानंतर, दुसऱ्या दिवशी 11 दिवसांची सुट्टी मध्यंतरी संपवून हे जोडपे ब्रिटनमधील त्यांच्या घरी परतले. त्यांच्या सुट्या वाया गेल्याचे या जोडप्याचे म्हणणे आहे.