मुंबई : प्रत्येक जीविताला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. मग भले तो, माणून असो, पक्षी किंवा जनावर. पक्षी अंडी घालतात आणि पक्ष्यांची अंडी पूर्णपणे बंद असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, जेव्हा अंडं पूर्णपणे बंद असतं, तेव्हा पिल्लू त्याच्या आत जिवंत कसं राहतं? त्याला ऑक्सिजन कुठून मिळतो? आज आपण यामागील कारण जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंडयाला नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की, अंडं हे एक कडक कवच आहे. ते बंद असतं. पण त्याखाली एक पडदा असतो. जे आपल्याला सहसा दिसत नाही. या पडद्याच्या मद्ये एक लहान वायु पेशी (air cell) असते. त्यात ऑक्सिजन भरलेला असतो.


अंड्यामध्ये असतात 7 हजार छिद्र


हे जाणून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कोंबडीच्या अंड्याच्या कवचामध्ये 7,000 पेक्षा जास्त छिद्रे असतात. भिंगाच्या साहाय्याने अंड्याकडे बारकाईने पाहिल्यास त्याच्या आत लहान छिद्रं दिसून येतील. यापैकी केवळ ऑक्सिजनच आत जात नाही, तर कार्बन डायऑक्साइडही बाहेर पडतो. याशिवाय या पेशींच्या मदतीने पिल्लांना पाणीही मिळतं.


दरम्यान ज्यावेळी अंड्यामधून पिल्लू बाहेर येतं तेव्हा ते एका द्रव पदार्थाने भिजलेलं असतं. पण हवेच्या संपर्कात आल्यावर ते लवकरच सुकतं.