Hamas Chief Yahya Sinwar Killed: इस्त्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने गुरुवारी (17 ऑक्टोबर) संध्याकाळी घोषणा केली की त्यांनी दक्षिण गाझामधील रफाह येथे टार्गेटेड ग्राउंड ऑपरेशनमध्ये हमास चीफ याह्या सिनवारचा खात्मा केला आहे. गाझा युद्धात इस्रायलला मिळालेलं हे सर्वात मोठे यश आहे. या कारवाईदरम्यान तीन सदस्यांना खात्मा केला गेला. या ऑपरेशनमध्ये मारल्या गेलेल्या या सदस्यांनापैकी एक याह्या सिनवार होता. त्याच्या ओळखीची पुष्टी डीएनए चाचणीच्या मदतीने केली गेली. वृत्तानुसार इस्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी अमेरिकेला याबाबत माहिती दिली आहे. याह्या सिनवार हा ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. वृत्तानुसार, त्यांनी ज्या इमारतीवर हल्ला केला त्या इमारतीत याह्या सिनवार असल्याची आयडिया इस्रायली सैन्याला नव्हती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, इमारतीवर हल्ला करणाऱ्या सैनिकांचे असे म्हणणे आहे की, याह्या सिनवार तिथे असू शकतो याची कोणतीही पूर्व माहिती इस्रायलला नव्हती. तसेच त्यांच्याकडे कोणतीही गुप्तचर माहिती नव्हती. बुधवारी सुरू झालेल्या चकमकीत सैनिकांनी अनेक तरुणांना इमारतीत घुसताना पाहिले, त्यानंतर हल्ल्याचे आदेश देण्यात आले. या हल्ल्यात ती इमारत अर्धवट कोसळली. 


सिनवारची ओळख नक्की कशी पटली?


इमारत कोसळल्यानंतर इस्त्रायली सैनिक पाहणी करण्यासाठी घटनास्थळी आतमध्ये गेले. या पाहणीवेळी त्याच्या लक्षात आले की मारल्या गेलेल्या तीन सदस्यांनापैकी एक याह्या सिनवारसारखा दिसत होता. या घटनास्थळावरून आलेल्या फोटोमधून याह्या सिनवारने लष्करी कपडे घातले असल्याचे दिसते. याह्या सिन्वारच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी इस्रायली सैनिकांनी नंतर डीएनएचे नमुने घेतले. 


 



कोण होता याह्या सिनवार?


  • याह्या सिनवार वय वर्ष 62 हा हमासचा चीफ होता. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा तो मास्टरमाइंड होता.

  • सिनवार हमासची प्लॅनिंग आणि लष्करी क्षमता आखण्यात मदत करत होता. 

  • वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सिनवारला ओळखणाऱ्या लोकांनी सांगितले की, त्याचे बालपण गाझामधील निर्वासित शिबिरात गेले. तो 22 वर्षे इस्रायलच्या कोठडीतही होता.

  • सिनवार हे आपले सर्व काम भूमिगत बोगद्यातून करत असत. इस्रायल 2023 पासून त्याचा शोध घेत होता. पण तो इतका सीक्रेट राहिला की हमासच्या काही लोकांनाच त्याचे स्थान माहीत होते. त्यांनी कोणतेही डिजिटल डिवाइस वापरत न्हवता.