Interesting Facts: जगात एकूण किती रंग आहेत? किती रंग मानवी डोळ्यांना दिसतात?
भौतिक शास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या डोळ्याला विशिष्ट श्रेणीच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे एका ठराविक वेवलेंग्थमध्ये दिसता
गायत्री पिसेकर, झी मीडिया, मुंबई: Colours in the world: नवरात्रीमध्ये तुम्ही 9 रंग घालत असालच. एकाच रंगाच्या अनेक छटा सध्या आपल्याला नवरात्रीच्या निमित्ताने पाहायला मिळतात. समजा आजचा रंग हिरवा आहे तर हिरव्या रंगाच्या अनेक शेड्स तुम्हाला दिवसभरात पाहायला मिळतात. हिरव्या रंगातही पोपटी, मोरपिशी, चटणी रंग, पिस्ता रंग, फिरोझी, रामा ग्रीन म्हणजेच टरक्वॉईश, अॅक्वा ग्रीन, आर्मी ग्रीन, ऑलिव्ह ग्रीन, बॉटल ग्रीन, टील, मिंट, लाईम ग्रीन, मॉस ग्रीन, पाईन ग्रीन, असे अनेक रंगाच्या शेड्स पाहायला मिळतात. आणि या प्रत्येक रंगाच्या मिळत्या जुळत्या रंगाच्या अनेक शेड्स पाहायला मिळतात. सोप्पं उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही मॅचिंग सेंटरच्या दुकानात गेलात तर तुम्हाला हवा तसा अगदीच मॅचिंग रंग मिळतोच असं नाही. त्यावेळी आपल्याला रंगाच्या बदलणाऱ्या छटांचा अंदाज येतो.
आता आपण रंगांविषयी थोडं अधिक जाणून घेऊया. भौतिक शास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या डोळ्याला विशिष्ट श्रेणीच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे एका ठराविक वेवलेंग्थमध्ये दिसतात. एखाद्या वस्तूवर प्रकाश पडल्यास ती वस्तू त्यातून प्रकाश परावर्तीत करते. जसं की पिवळ्या रंगाच्या फुलावर सुर्यप्रकाश पडल्यावर त्यामुळे त्या रंगाचे तरंग परावर्तीत होतात.
माणसाच्या डोळ्यातील रेटीनामध्ये साधारणत: तीन कोन असतात. त्यामुळे आपल्याला रंगांचं वर्गीकरण करणं शक्य होतं.
शॉर्ट वेव कोन्स: जांभळ्या आणि निळ्यासारख्या कमी तरंग लांबी असलेल्या रंगासाठी संवेदनशील असतो.
मिडल वेव कोन्स: पिवळा आणि हिरव्या रंगासारख्या मध्यम तरंग लांबी असलेल्या रंगासाठी संवेदनशील असतो.
लॉन्ग वेव कोन्स: लाल आणि नारंगी रंगासारख्या जास्त तरंग लांबी असलेल्या रंगासाठी संवेदनशील असतो.
यास ट्रायक्रोमसीचा सिद्धांत म्हणतात. यामुळे तीन प्रकारच्या शंकूंमधील फोटोपिग्मेंट्समुळे आपल्याला रंगाचे संपूर्ण स्पेक्ट्रम ओळखता येतात.
फोटोपिग्मेंट्स हे ऑप्सिन नावाच्या प्रथिने आणि प्रकाशासाठी संवेदनशील असलेल्या रेणूपासून बनलेले असतात. हा रेणू 11-cis रेटिना म्हणून ओळखला जातो. विविध प्रकारचे फोटोपिग्मेंट्स विशिष्ट रंगांच्या तरंगलांबींवर प्रतिक्रिया देतात ज्यासाठी ते संवेदनशील असतात, ज्यामुळे आपल्या डोळ्यांना रंग ओळखण्याची क्षमता निर्माण होते.
टेट्राक्रोमॅट्समध्ये चौथ्या प्रकारचा शंकू असतो ज्यामध्ये फोटोपिगमेंट असते. त्यामुळे सामान्यत: दृश्यमान स्पेक्ट्रमवर नसलेल्या अधिक रंगांचे आकलन आपण करु शकतो. स्पेक्ट्रम ROYG. BIV (लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, इंडिगो आणि व्हायलेट) म्हणून ओळखला जातो. या अतिरिक्त फोटोपिगमेंटमुळे टेट्राक्रोमॅटला दृश्यमान स्पेक्ट्रमहून अधिक तपशील किंवा रंग ओळखण्याची क्षमता प्राप्त होते. शकते. याला टेट्राक्रोमसीचा सिद्धांत म्हणतात.
आपले डोळ साधारण किती रंग पाहू शकतात? ओळखू शकतात?
ट्रायक्रोमॅट्सनुसार आपण 1 दशलक्ष रंग पाहू शकतो, तर रंग दृष्टीचा विस्तृत अभ्यास करणारे जे नीट्झ, (पीएचडी, वॉशिंग्टन विद्यापीठातील नेत्ररोग प्राध्यापक) यांच्या म्हणण्यानुसार टेट्राक्रोमॅट्सनुसार आपण 100 दशलक्ष रंग पाहू शकतो.