Optical Illusion : तुम्ही हुशार असाल, तर या फोटोत तुम्हाला किती चेहरे दिसतायत ते शोधून दाखवा
तुम्हीही या फोटोमध्ये जास्तीत जास्त चेहरे शोधण्याचा प्रयत्न करा आणि तुमची IQ पातळी तपासा.
मुंबई : या समोर आलेल्या फोटोमध्ये दिसणारे पेंटिंग खूप प्रसिद्ध आहे आणि ही प्रतिमा मेक्सिकन कलाकार ऑक्टावियो ओकॅम्पोने डॉन क्विझोट म्हणून ओळखली आहे. परंतु एवढंच या फोटोचं वैशिष्ट्य नाहीय, तर या फोटोमध्ये बऱ्याच गोष्टी लपलेल्या आहेत. ज्या आपल्या डोळ्यांना चकमा देत आहेत. खरंतर अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो असे म्हणतात आणि सध्या सोशल मीडियावर असेच फोटो व्हायरल होत आहेत. जे सर्वांना विचार करायला भाग पाडतात.
हा फोटो देखील तसाच आहे. ज्यामधून तुम्हाला चेहरे शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हीही या फोटोमध्ये जास्तीत जास्त चेहरे शोधण्याचा प्रयत्न करा आणि तुमची IQ पातळी तपासा.
तुम्हाला यामध्ये किती चेहरे दिसले?
ऑक्टाव्हियो ओकॅम्पोच्या इल्यूजन फोटोमध्ये एकाच फोटोतून संपूर्ण कथा सांगण्याची क्षमता आहे. हा भ्रम फार प्रसिद्ध आहे. या फोटोमध्ये तुम्ही दोन व्यक्तींना थेट पाहू शकता. जर तुम्ही जमिनीकडे नीट बघितले तर तुम्हाला कुत्र्याचा चेहराही दिसेल. जर तुम्ही फोटो नीट बघत राहिलात तर तुम्हाला हळूहळू बहुतेक चेहरे दिसू लागतील.
मग आता तुम्हाला यामध्ये किती चेहरे दिसले?
किल्ल्याच्या भिंतीवर ड्यूकचा चेहरा देखील दिसेल. फोटो सतत पाहिल्यावर तुम्हाला हळूहळू आणखी चेहरे दिसू लागतील. या फोटोमध्ये तुम्हाला 15 हून अधिक चेहरे सापडतील पण हा फोटो इतका गुंतागुंतीचा आहे की, लोकांना योग्य उत्तर सापडत नाही.
Above-Average Mind या ऑप्टिकल भ्रमात 15 पेक्षा जास्त चेहरे पाहू शकतात. जर तुम्हाला या व्हायरल फोटोमध्ये 15 पेक्षा जास्त चेहरे आढळले असतील, तर अभिनंदन तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात.