How to Keep Dry Fruits Fresh For Long Time : कधीकाळी फक्त ठरावीक लोकांच्या घरी असणारा सुका मेवा आज प्रत्येक घरात आपल्याला पाहायला मिळतो. सुका मेव्याचे सेवन रोजच्या जीवनात झाले पाहिजे असे म्हटले जात असले तरी बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याचे सेवन आपण रोजच्या जीवनात नाही करत. काही लोकांना तर सुका मेवा हा फक्त खीर, हलवा आणि मिष्टांन्नांमध्येच खायला आवडतो. त्यामुळे बऱ्याचवेळा असं होतं की घरात सुका मेवा हा घरात इतका वेळ राहतो की आपण विसरतो आणि त्याचा परिणाम असा होतो की त्याला बुरशी किंवा मग किड लागते. बऱ्याचवेळा त्यात असलेल्या तेलाचा वासही येऊ लागतो. याचं मुख्य कारण हे सुक्या मेव्याचे योग्य प्रकारे न ठेवणे आहे. आज आपण ड्रायफ्रुट्स म्हणजेच सुका मेवा कशा प्रकारे साठवू शकतो हे जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुका मेवा विकत घेताना घ्या ही काळजी
बरेच लोक आहेत जे सुका मेवा खरेदी करताना सील बंद पॅकेट विकत घेणे पसंत करतात. पण बऱ्याचवेळा त्यानं त्या सुक्या मेव्यात असलेल्या तेलाचा वास येऊ लागतो. ज्यामुळे सुक्या मेव्याची चव कडू किंवा खौट लागते. त्यामुळे नेहमी जे खुले किंवा मोकळ्यात ठेवलेले ड्राय फ्रुट्स विकत घ्या. तर सुका मेवा विकत घेताना आधी तुम्ही त्याचा वास घेऊन किंवा मग त्याला खाऊन ते चांगल्या परिस्थितीत आहेत ना हे तपासू शकतात. 


सुका मेव्याला घ्या भाजून
सुका मेवा खूप काळ टिकायला हवा आणि त्यातून वास यायला नको असे तुम्हालाही वाटत असेल तर तुम्ही त्यांना रोस्ट करून मग स्टोअर करा. त्यामुळे सुका मेवा बराचकाळ किंवा बरेच महिने नीट राहिल याचाच अर्थ खराब होणार नाही. त्याशिवाय याला कीड किंवा बुरशी लागणार नाही. त्याची चवही जशी आहे तशीच राहिल आणि त्यासोबत ते बराचकाळ फ्रेश राहतील.


एअर टाइट कंटेनरमध्ये करा स्टोअर 
सुका मेवा जर तुम्हाला सांभाळून ठेवायचा किंवा खराब होऊ नये याची काळजी करत ठेवायचा असेल तर एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवा. त्यानं बाहेरची हवा आत जाणार नाही. कारण मोठ्या प्रमाणात सुका मेवा खराब होण्याचं कारण हे हवा लागणं आहे. त्यानं सुक्या मेव्याला कीड आणि बुरशी लागते. त्याशिवाय रुम टेम्परेचरमध्ये करा स्टोअर


हेही वाचा : IMDb च्या टॉप 50 लिस्टमध्ये तुमच्या आवडत्या वेब सीरिज आहेत का? जाणून घ्या...


काचेचं भांड वापरा
ड्रायफ्रुट्य ठेवण्यासाठी काचेच भांड वापरल्यास उत्तम ठरेल. त्यात असलेला सुका मेवा खराब होण्यापासून वाचतो, त्यासोबतच त्यात वास देखील येत नाही. काचेच्या कंटेनरमध्ये सेका मेवा ठेवल्यास तो बऱ्याचकाळ फ्रेश राहतो. त्यासोबत तुम्ही ठेवलेल्या या सुक्या मेव्याची चवही जात नाही तर त्यासोबत ते खराब देखील होत नाहीत.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)