नवी दिल्ली : अफगाणिस्तानची राजधानी काबूल आज रमझानच्या पवित्र महिन्यात हादरलीय. सकाळी सकाळी शहाराच्या मध्यभागी झालेल्या कार स्फोटात ५० जण ठार झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्फोटाच्या स्थळापासून भारतीय दूतावास अवघ्या १.५ किलोमीटर अंतरावर आहे. स्फोटाचा आवाज इतका जबरदस्त होता की त्यामुळे दूतावासाच्या इमारतीचं बरंच नुकसान झालंय. सुदैवानं भारतीय दूतावासातल्या कुठल्याही कर्मचाऱ्याला इजा झालेली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

कारमध्ये बसलेल्या एका सुसाईड बॉम्बरनं स्वत:ला उडवून घेतल्याचं सांगितलं जातंय. अफगाणिस्तानच्या आंतरिक मंत्रालयाच्या माहितीनुसार, काबुलच्या ज्या भागात हा स्फोट झाला तिथं अनेक देशांचे दूतावास आहेत.