नवी दिल्ली : कुणी कुत्रा पाळतं... तर कुणी मांजर... पण, जर्मनीच्या एका प्राणीप्रेमीनं मात्र गाढवं पाळलं... आणि मग काय... त्याला गाढव पाळण्याचं चांगलाच फटकाही बसलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'फाइटस' असं या पाळीव गाढवाचं नाव आहे. त्याच्या मालकानं त्याला खूप प्रेमानं पाळलंय... परंतु, एके दिवशी फाईटस चरता चरता एका पार्किंग स्थळावर दाखल झाला. समोर उभी असलेली नारंगी रंगाची कार म्हणजे गाजरचं आहे, असं समजून फाईटसनं ही कार चावायला सुरूवात केली. यामुळे या कारचं मोठं नुकसान झालं. 


४९ वर्षीय मार्कस नावाच्या व्यक्तीची ही कार होती. हे प्रकरण कोर्टात पोहचल्यानंतर कोर्टानं कार मालकाला नुकसान भरपाई मिळेल याची तरतूद केली. 


या नुकसान भरपाईसाठी गाढवाच्या मालकाला ५००० पाऊंड म्हणजेच तब्बल ४ लाख ३७ हजार रुपये कार मालकाला द्यावे लागणार आहेत.