यापुढे Restaurant मध्ये पती-पत्नीला एकत्र जाता येणार नाही; डिनर डेटला कायमचा पूर्णविराम
डिनर डेट किंवा सहजच रेस्तराँमध्ये येत निवांत वेळ व्यतीत करण्याला त्यांचं प्राधान्य असतं
काबूल : कुटुंबातील रोजच्या कामातून वेळ काढत अनेकदा काहीतरी वेगळं अनुभवण्यासाठी म्हणूनसुद्धा Restaurant ची वाट धरली जाते. डिनर डेट किंवा सहजच रेस्तराँमध्ये येत निवांत वेळ व्यतीत करण्याला त्यांचं प्राधान्य असतं. पण, यापुढे हे चित्र दिसणार नाहीये.
सूत्रांच्या माहितीनुसार पती आणि पत्नी यापुढे एकत्र कधीच रेस्तराँमध्ये जाऊ शकणार नाहीत. सत्ताधाऱ्यांकडूनच हा नवा नियम लागू करण्यात आल्यामुळं सध्या संपूर्ण देशात तणावाचं वातावरण आहे.
हा कायदा लागू करणारा देश आहे, अफगाणिस्तान. तालिबानची सत्ता आल्यापासून नाही म्हटलं तरीही या देशात बऱ्याच नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले. महिलांसाठी हे कायदे अधिक कठोर होताना दिसले. (Taliban Afghanistan)
आता यात आणखी एका नियमाची भर पडली आहे, जिथं पती आणि पत्नी यांना एकत्र रेस्तराँमध्ये जाता येणार नाही. तर, उद्यानांमध्ये महिला आणि पुरुषांना वेगवेगळ्या तारखांना जाता येणार आहे.
तालिबान सत्तेवर आल्या क्षणापासून महिलांबाबतचे कायदे अफगाणिस्तानमध्ये झपाट्यानं बदलले आणि त्यातच भरीला आणखी एक नियम आला. अगदी शाळांमध्येही विद्यार्थीनींना विद्यार्थ्यांसोबत फोटो काढण्यावर बंदी लावण्यात आली.
अफगाणिस्तानमध्ये जाहिरपणे मानवी हक्क आणि महिलांच्या स्वातंत्र्याच्यावर गदा आणली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील कार्यकाळाच्या तुलनेत यावेळी असणारे कायदे मानवी हक्कांची पायमल्ली करणारे नसलीत असं सांगण्यात आलं होतं. पण, आता तेसुद्धा या शब्दावरून फिरले असल्याचं स्पष्ट होत आहे.