Crime News : पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्याची क्रूरता ऐकून आपल्या तळमस्तकातील आग डोक्यात जाते. ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून आपण नवीन आयुष्याची सर्वात करतो तोच व्यक्ती तब्बल 10 वर्ष बायकोला परपुरुषाकडे शारीरिक सुखासाठी देते होतो. तो दररोज रात्री तिला अंमली पदार्थ देऊन बेशुद्ध करायचा आणि घरी अनोळखी पुरुषांना बोलवायचा.  त्यानंतर हे पुरुष तिच्यावर बलात्कार करायचे आणि हा नराधम त्यांचा व्हिडीओ काढायचा. 


ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या क्रूर आणि नराधम व्यक्तीने ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा उपयोग पत्नीचे शारीरिक शोषण करण्यासाठी केला. 'विदाऊट हर नोइंग' या नावाच्या ऑनलाइन मंचाचा तो वापर करत होता.'द टेलिग्राफ'मधील वृत्तानुसार, तब्बल 10 वर्ष त्याची ही हैवानियत सुरु होती. 


एकापेक्षा एक धक्कादायक कृत्य


तो दररोज रात्री तिला जेवण्यातून अंमली पदार्थ द्यायचा आणि तिला बेशुद्ध करायचा. त्यानंतर तो अनोळखी पुरुषाला घरी बोलवायचा. बायकोला आणि शेजारी राहणाऱ्यांना त्याचा कारनामाची खबर लागू नये म्हणून तो पूर्ण खबरदारी घ्यायचा. ज्या लोकांना तो घरी बोलवायचा त्यांना तंबाखू आणि परफ्यूम वापरण्यावर तो मनाई करायचा. तीव्र वासाने त्याच्या पत्नीला शुद्ध म्हणून तो ही काळजी घ्यायचा. 


त्याशिवाय शेजारी राहणाऱ्या लोकांना कळू नयेत की त्याचा घरी रोज कोणी तरी येत आहे. यासाठी तो घरापासून दूर शाळेजवळ त्यांना गाडी पार्क करायला सांगायचा. इतकंच नाही तर पत्नीला वातावरणातील तापमानाचे बदल कळू नये म्हणून त्या लोकांना तो गरम पाण्याने हात धुण्यास सांगायचा. त्याशिवाय बाथरुमऐवजी तो ग्राहकांना स्वयंपाकघरात कपडे काढण्यास सांगायचा. कोणालाही संशय येऊ नये म्हणून तो त्या लोकांना अंधारातून येजा करायला सांगत होता. 


असं उघड झालं भयानक कृत्य


हा नराधम एकदा सुपरमार्केटमध्ये गेला होता, तेव्हा त्याने एका महिलेचा स्कर्टची व्हिडीओ काढल्या त्यानंतर त्याला या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यावेळी त्याचा मोबाईल आणि इतर चौकशी दरम्यान ही धक्कादायक घटना समोर आली. पत्नीसोबतच्या अत्याचाराचे डझनभर व्हिडीओ त्याच्याकडे सापडले. (husband drugging wife filming her physically assaulted 83 unknown males for 10 years Franch news)


कुठली आहे ही घटना?


ही घटना फान्समधील असून त्या नराधमाचं नाव डॉमिनिकल आहे. पोलिसांना चौकशी दरम्यान अनेक भयानक खुलासे झाले. पोलिसांनी 2011 ते 2020 दरम्यान बलात्काराच्या 92 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 83 लोकांची ओळख पटली आहे. यातील काही जणांचं म्हणं आहे की, त्यांना माहिती नव्हतं की त्याचा पत्नीचा या सगळ्याला विरोध होता. तर काही जणांचं म्हणं आहे की, ती नाटक करत आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या क्रूरतेमध्ये 51 पुरुष असं आहेत ज्यांचं वय 26 ते 73 वर्षे इतके आहेत. तर उर्वरीत आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. ही हादरवणारी घटनेचं अजून एक सत्य म्हणजे त्या दोघांचा लग्नाला 50 वर्ष झाली असून त्यांना तीन मुलं आहेत.