लग्नाच्या दिवशी नवऱ्याने असं काही केलं की तिने घेतला घटस्फोट; सासरची मंडळी कारण ऐकून थक्क
Wife Divorced Husband On Wedding Day: तिला तिच्या नातेवाईकांनी समजावण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र ती तिच्या निर्णयावर कायम राहिले. यासंदर्भातील सविस्तर भूमिकाही तिने मांडली आहे.
Wife Divorced Husband On Wedding Day: लग्नगाठ ही स्वर्गात बांधली जाते असं म्हटलं जातं. आपल्या लग्नाचा दिवस कायम स्मरणात रहावा म्हणून बरेच जण वेगवेगळ्या आणि हटके गोष्टी करत असतात. लग्नाचा पहिला दिवस अनेकांना वेगवेगळ्या कारणांसाठी अविस्मरणीय असतो. हा दिवस कायम लक्षात राहण्यासाठी लग्न झालेले वधू-वराबरोबरच त्याच्या आजूबाजूचे अनेकजण झटत असताना दिसतात. मात्र कधीतरी उत्साहामध्ये जोडीदाराला काय आवडतं काय नाही याचा विचार न करता काही गोष्टी होतात आणि मग त्यातून गोष्टी बिघडतात. एका जोडप्याबरोबर असाच काहीसा प्रकार घडला की तिने लग्नाच्या दुसऱ्या दिवशी घटस्फोट मागितला.
नक्की घडलं काय?
कालच सुरु झालेला संसार आज का मोडायचा आहे हे तिच्या सासरच्यांनाही कळत नव्हतं. मात्र तिने सांगितलेलं कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला. या नववधूला समजावण्याचा अनेकांनी प्रयत्न केला मात्र तिने कोणाचंही ऐकलं नाही. 'न्यू यॉर्क पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, हा सारा प्रकार एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये नुकतेच लग्न झालेला नवरा मुलगा नवरीच्या चेहऱ्यावर केक लावण्यासाठी केकचा एक मोठा तुकडा उचलून अगदी आक्रमकपणे तिच्या चेहऱ्यावर फेकून मारतो. नवऱ्याने ताकद लावून फेकलेला हा तुकडा चेहऱ्यावर लागल्याने या तरुणाची तोल जाऊन ती खाली पडते. हा सारा प्रकार पाहून उपस्थित पाहुणे हसू लागला. हा सारा प्रकार नवरीला आवडत नाही. हा आपला अपमान असल्याचं मानून ही तरुणी थेट घटस्फोटाची मागणी करते.
तिने आपली भूमिका मांडताना काय म्हटलं
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या 'रेडिट'वर एक पोस्ट शेअर करत या केक मारण्याचा प्रकाराचा उल्लेख करताना यामुळे आपलं लग्न मोडल्याचं म्हटलं आहे. पतीने लग्नाच्या दिवशीच सर्व पाहुण्यांसमोर केलेल्या प्रकारामुळे ही महिला फारच संतापली आणि तिने थेट घटस्फोटाचा निर्णय घेतला. आपल्या पतीला हे असले दुसऱ्याची थट्टा करणारे व्हिडीओ मजेदार वाटतात असंही या महिलेने पोस्टमध्ये म्हटलेलं. या पोस्टमध्ये महिलेने लिहिलेला मजकूरात तिने, मी 17 वर्षांची असताना माझ्या आईने माझ्या चेहऱ्यावर केक मारला होता. मात्र केकवरील सजावटीसाठी वापरलेल्या वस्तूमुळे मला इजा झालेली. मी मेणबत्तीला फूक मारल्यानेतर आईने माझं डोक केकवर आपटलं. अचानक हे सारं घडल्याने मला सावरायला वेळ मिळाला नाही. माझ्या कपाळाला दुखापत झाली. माझ्या माथ्यामधून रक्त येऊ लागलं. जखम मला गंभीर वाटत होती. मी रुममध्ये गेले आणि दिवसभर बाहेरच आले नाही. माझी आई मला हा माझा बालीशपणा असल्याचं सांगत डिवचते," असं म्हटलं आहे.
41 हजारांचा होता तो केक
"मी माझ्या नवऱ्याला कोणी माझ्याबरोबर असं केलं तर मी त्याला सोडून जाईन असं सांगितलं. त्यावर तो हसू लागला. मात्र तो मला गांभीर्याने घेत नसल्याचं मला वाटलं," असं या महिलेने पोस्टमध्ये म्हटलं आहे. "नवऱ्याने अचानक केक चेहऱ्यावर लावल्याने केवळ मेकअप आणि केस नाही तर ड्रेसही खराब झाला. माझं चारचौघांमध्ये हसू झालं. थोडी मस्ती करण्याच्या नावाखाली त्याने मला इतर लोकांसमोर लाज वाटेल असं कृथ्य केलं. तेव्हापासूनच मला त्याची चीड येऊ लागली. त्याने 500 डॉलर्सचा (भारतीय चलनानुसार 41 हजार रुपये) केकही नासवला. त्या केकबरोबरच आमचं नातंही संपलं," असं या महिलेने म्हटलं आहे.
रेडिटवर या महिलेच्या बाजूने आणि विरोधात असे 2 गट पडले असून काहींनी तिचा निर्णय बरोबर असल्याचं म्हटलंय तर काहींनी निर्णय चुकल्याचं म्हटलं आहे.