Model Monica: अमेरिकेतील सुपर मॉडल मोनिका हिने आपल्या सौंदर्याबद्दल एक विधान केलं आहे. मी इतकी सुंदर आहे की जिममध्ये मुद्दाम पुरुष मला धडक देतात असं मोनिकाने म्हटलं आहे. चुकून का असेना आपल्याला स्पर्श करण्याची संधी मिळावी या हेतूने पुरुष असं करतात असा दावाही मोनिकाने केला आहे. सातत्याने होणाऱ्या या प्रकाराला कंटाळून मोनिकाने आता महिन्याला लाखो रुपये पगार घेणाऱ्या एका  बॉडीगार्डची नेमणूक कण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा बॉडीगार्ड जीममध्ये (need bodyguards at gym) होणाऱ्या या अश्लील गोष्टींपासून आपलं संरक्षण करेल असा विश्वास मोनिका यांनी व्यक्त केला आहे.


जाणूनबुजून स्पर्श करण्याचा प्रयत्न


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोनिका हल्डट अमेरिकेतील अॅरोझॉना येथे वास्तव्यास आहे. आठवड्यातून किमान पाच वेळा मोनिका जिममध्ये जाते. मात्र आपलं सुंदर शरीर फिट ठेवण्यासाठी ट्रेनिंग म्हणून जिमला जाते तेव्हा नेहमी तेथील लोक घाणेरड्या नजरेने तिच्याकडे पाहतात. "मी कोणाच्या नजरा रोखू शकत नाही किंवा डोळे फोडू शकत नाही. मात्र आपल्याला अशा लोकांना मला धडा शिकवण्याची इच्छा आहे. कारण नसताना माझ्याबद्दल बोलणाऱ्या आणि जाणूनबुजून स्पर्श करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अद्दल घडवायची माझी इच्छा आहे," असं मोनिका सांगते.


"जिम ही सुरक्षित जागा मात्र या ठिकाणीही..."


मूळची पोलंडची असलेली मोनिका ही सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय असून जगभरात तिचे कोट्यावधी चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो चाहते आहेत. अनेकदा याच सोशल मीडियामुळे मोनिकाला मनस्तापही सहन करावा लागतो. अनेकजण कमेंट्समधून अश्लील विधान करत असतात. अशाप्रकारच्या मेसेजेमुळे मी कंटाळले असून लंपट लोकांना आता मी क्षणभरही सहन करु शकत नाही, असं मोनिका सांगते. पुरुषांच्या या साऱ्या वागण्याला कंटाळलेल्या मोनिकाने, "जिम ही सुरक्षित जागा आहे. मात्र या ठिकाणीही वाईट नजरेच्या लोकांनी माझा पाठलाग करणं सोडलेलं नाही, अशा शब्दांमध्ये खेद व्यक्त केला आहे.


दोन लाख रुपये पगार देण्याची तयारी


या सुंदर मॉडेलने स्वत:च्या आयुष्याबद्दल आणखीन एक धक्कादायक खुलासा करताना आपल्या सौंदर्यामुळे आपल्याला लैंगिक छळाचाही समाना करावा लागाल्याचं म्हटलं आहे. अनेकदा माझा लैंगिक छळ झाला आहे, असं मोनिका म्हणाली. चुकीच्या अर्थाने केलेला स्पर्श मला लगेच कळतो असा दावा मोनिका करते. याच साऱ्या गोष्टींमुळे मोनिका आता लवकरात लवकर एका बॉडीगार्डला नियुक्त करणार आहे. "व्यायाम करणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कारण या माध्यमातून मी केवळ शारीरिक दृष्ट्या नाही तर मानसिक दृष्ट्याही सक्षम राहते," असं मोनिका सांगते. त्यामुळेच जिम सोडता येणार नसल्याने आता अगदी दोन लाख रुपये महिना पगार देऊन बॉडीगार्ड नेमण्याच्या निर्णयापर्यंत मोनिका पोहोचली आहे. मोनिकाच्या या विधानानंतर तिच्याबद्दल गुगलवर माहिती शोधणाऱ्यांची संख्या वाढल्याचंही सांगितलं जात आहे.