बॉडी बिल्डरला स्वतःशीच ठेवायचेत संबंध, काय आहे हे अजब प्रकरण
स्वतःवरच जीवापाड प्रेम करणारा बॉडी बिल्डर... त्याच्या इच्छा आणि अपेक्षा वाचून व्हाल थक्क
मुंबई : कुणाची काय फॅनटसी असेल काहीच सांगू शकत नाही. एका व्यक्तीला स्वतःशीच संबंध ठेवायचेत, ही गोष्ट वाचायला अजब वाटेल. पण हे खरं आहे. एका व्यक्तीला चक्क स्वतःशीच संबंध ठेवायचे आहेत. या व्यक्तीचं स्वतःवर विशेष प्रेम आहे. यावर्षी ही व्यक्ती स्वतःवर प्रेम करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहे. त्याला स्वतःशीच संबंध ठेवायचे आहेत.
स्वतःसोबत संबंध ठेवण्याची इच्छा
डेली स्टारमध्ये दिलेल्या माहितीनुसार, स्वतःसाठी संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे यूरी टोलोच्को (Yuri Tolochko). ती व्यक्ती एक बॉडी बिल्डर असून या व्यक्तीचं वय ३७ वर्षे आहेत.
स्वतःसोबत संबंध ठेवण्यासाठी ही व्यक्ती अवघ्या काही वेळातच चर्चेत आली आहे.
बाहुलीसोबत केलं लग्न
यूरीने या अगोदरच दोन डॉलसोबत लग्न केलं आहे. एका डॉलच नाव लूना आणि दुसरं नाव लोला आहे. यूरीने सांगितलं की, डॉल डोलासोबत लग्न केल्यानंतर त्याला कळलं की दुसऱ्यावर प्रेम करण्यापेक्षा मी स्वतःवर प्रेम करायला हवं.
संबंध ठेवताना तो स्वतः व्हिडीओ शूट करतो. धक्कादायक म्हणजे हा व्हिडीओ नंतर पाहून तो आनंद घेतो.
त्याला आवडतो स्वतःचाच सुगंध
युरीने सांगितले की त्याला स्वतःचा सुगंध खूप आवडतो. तो स्वतःच्याच सुगंधाने मदमस्त होतो. युरीने सांगितले की त्याला प्रेमासाठी यापुढे कोणाचीही गरज भासणार नाही. त्याला स्वतःचेच प्रेम हवे आहे.
यूरीने सांगितलं की, त्याला कधी कोणत्या गोष्टीवर प्रेम होईल ते सांगता येणार नाही. त्याला कधी आत्मा, फोटो, व्यक्ती कोणावरही प्रेम जडू शकतं. यूरीने सांगितलं की, वेगवेगळे प्रेम करणारे ग्रुप त्यांना करायचे आहेत.