Alien : एलियन खरचं अस्तित्वात आहेत का? याबाबत कोणीही  ठोस पुरावे देऊ शकलेले नाही. अनेक जण एलियन सोबत संपर्क झाल्याचा दावा करत आहेत. तर, अनेक जण सातत्याने अथकपणे एलियनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, जर खरचं एलियन आणि मानवाची भेट झाली तर  मोठ संकट येईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. यामुळेच एलियनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करु नये असा इशारा तज्ञांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या प्रमाणे पृथ्वीवर जीवसृष्टी आहे त्याचप्रमाणे इतर ग्रहावरही एलियन आहेत असा दावा केला जात आहे. जर, इतर ग्रहावर एलियन असतील तर आपण त्यांच्याशी संपर्क कसा साधावा? असे अनेकांना वाटते. जगभरातील अनेक संशोधक एलियनची संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मानवाने एलियनशी संपर्क साधणे थांबवले पाहिजे. अशाच प्रकारे मानव एलियनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत राहिला तर  सर्वजण धोक्यात येऊ शकतात असा इशाराएलियन्सचा शोध घेणाऱ्या SETI या संस्थेचे ज्येष्ठ ग्रह खगोलशास्त्रज्ञ डॉ. फ्रँक मार्चिस यांनी दिला आहे. 


एलियनशी संपर्क साधल्यास काय धोके निर्माण होवू शकतात


2021 मध्ये भौतिकशास्त्रज्ञ मार्क बुकानन यांनी एलियनशी संपर्क धोकादायक असल्याचा दावा केला होता. जर आपण एलियन्सशी संपर्क साधला. यानंतर  ते मानवाला भेटण्यासाठी अंतराळात प्रवास करून पृथ्वीवर पोहोचले संकट निर्माण होवू शकते. एलियन्सकडे असलेले तंत्रज्ञान आपल्यापेक्षा खूप प्रगत आहे. कदाचित त्यांच्याकडे प्रकाशापेक्षा वेगाने प्रवास करण्याचे तंत्रज्ञान असू शकते जे पृथ्वीसाठी धोकादायक ठरु शकते अशी भिती मार्क बुकानन यांनी व्यक्त केली आहे.


एलियन कसे असू शकतात याबाबत अनेक कल्पना


एलियन कसे दिसू शकतात याबाबत अनेक कल्पना मांडण्यात आलेल्या आहेत. मात्र, एलियन कसे असू शकतात याबाबत अनेक कल्पना मार्चिस यांनी अनेक तर्क मांडले आहेत. एलियन्स मानवापेक्षा शक्तीशाली असतील तर ते एका झटक्यात आपला नाश करतील अशी शक्यता आहे. ही एक भयानक संभावना आहे.  एलियन आपल्याला किंवा आपल्या ग्रहाचा एक संसाधन म्हणून वापर करु शकतात. पृथ्वीवरील पाणी तसेच इतर ऊर्जा स्त्रोतांचा ते वापर करु शकतात. किवा पृथ्वीवरील मानवाला धोका समजून ते मानवाला नष्ट देखील करु शकतात.


एलियन्सबद्दल नासाचे काय म्हणणे आहे?


एलियन्स अस्तित्वात नसल्याचे नासाचे म्हणणे आहे. परग्रहावर जीवसृष्टी असू शकते नाकारणे योग्य नसल्याचे देखील नासाचे म्हणणे आहे. अनेक  यूएफओ दिसले आहेत. हे यूएफओ   ग्रहावरील जीवनाशी संबंधित आहेत. अमेरिकन स्पेस एजन्सीने एलियन्सचा शोध घेण्यासाठी विशेष टीम बनवली आहे. अमेरिकन सरकारचा एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. 2004 पर्यंत, 140  एलियन स्पेसशिप दिसल्या होत्या असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.