मास्क न घातल्यास `या` देशात होतेय कठोर शिक्षा
या देशांमध्ये फेस मास्क न घालणाऱ्यांवर सरकारकडून अत्यंत कठोर कारवाई करण्यात येत आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरस जगभरातील 190 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी फेसमास्क (Face Mask) सर्वात गरजचं आहे. मास्क घालणं सर्वच देशांमध्ये आवश्यक आहे. मास्क न घातल्यास अनेक देशांमध्ये शिक्षेचीही तरतूद आहे. पण मास्क न घातल्यास शिक्षा देण्याच्या बाबतीत अरब देश सर्वांच्याच पुढे आहेत. या देशांमध्ये फेस मास्क न घालणाऱ्यांवर सरकारकडून अत्यंत कठोर कारवाई करण्यात येत आहे.
कुवेत आणि कतारमध्ये जर कोणत्याही व्यक्तीने मास्क घातलं नाही, तर अशा लोकांना तुरुंगवासाची शिक्षा तसंच त्यांच्याकडून दंडही आकारण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुवेतमधील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मास्क न घातल्यामुळे दोषी ठरलेल्या व्यक्तीला तीन महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.
तर कतारमध्ये मास्क न घातल्यास तब्बल तीन वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
इतकंच नाही तर या देशात मास्क न घातल्यास मोठा दंडदेखील आकारण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुवेतमध्ये जास्तीत-जास्त दंड 5 हजार दिनार (16,200 डॉलर) इतका आहे. तर कतारमध्ये हा दंड तब्बल तीन पटींनी अधिक आहे. म्हणजेच 200,000 रियाल (55,000 डॉलर) इतका आहे.
मलेशियात ५० दिवसांनंतर मॉल सुरू ; वस्तूंवर बुरशीचं साम्राज्य
यापैकी 6 आखाती देशांमध्ये कोरोना व्हायरसचे आतापर्यंत 1 लाख 37 हजार 400 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 693 लोकांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला या देशांमध्ये ज्या लोकांची ट्रॅव्हल हिस्ट्री होती त्या लोकांमुळे संसर्ग होत होता. मात्र लहान-लहान घरात राहणाऱ्या अल्प उत्पन्न असलेल्या स्थलांतरित कामगारांमध्ये या व्हायरसचा प्रसार होण्यास सुरवात झाल्यानंतर या समस्येने मोठं रुप धारण केलं.
दिलासादायक : युरोपातील 'हा' देश कोरोना मुक्त
आखाती देशांपैकी, सर्वात पहिल्या क्रमांकावर 30 मिलियन लोकसंख्या सौदी अरबमधून कोरोनाची सर्वाधिक प्रकरणं समोर आली आहेत. सौदी अरबमध्ये 54 हजार 700 जणांना कोरोनाची लागण झाली असून 312 जणांचा मृत्यू झाला आहे.
यूएईमध्ये कोरोनाचे रुग्ण तुलनेने कमी असले तरी तेथे मृतांचा आकडा दुसऱ्या क्रमांकावर आहे. यूएईमध्ये 23 हजार 350 कोरोनाग्रस्त असून 220 जण दगावले आहेत.
तर 2.8 मिलियन लोकसंख्या असलेल्या कतारमधून 32 हजार 600 जण कोरोनाबाधित आढळले असून 15 जणांचा मृत्यू झाला आहे.