Strange Decision Of Italian Court: जगभरात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा प्रकरणांमध्ये सापडलेले आरोपी यातुन सुटका होण्यासाठी अनेक शकला लढवतात. मात्र, आता कोर्टानेच आरोपींना वाचवणारा निर्णय दिला आहे. 10 सेकंद छेडछाड झाली असेल तर आरोपी निर्दोष आहे. इटालियन न्यायालयाने हा अजब निर्णय दिला आहे. यामुळे इटलीतील महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 


काय आहे नेमकं प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इटालियन वृत्तपत्र Corriere della Sera याबाबतचे वृत्त दिले आहे. रोम मध्ये ही घटना घडली आहे. शाळेच्या केअर टेकरने 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पीडीत तरुणी शाळेच्या पटांगणात  चालत असताना पडली. यावेळी आरोपीने तिला उचलण्याच्या बहाण्याने तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. ही बाब तरुणीच्या लक्षात आली तिने या केअरटेकर विरोधात  पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 


फक्त 10 सेकंद स्पर्श केला


पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले. तरुणीला स्पर्श केल्याची कबूली आरोपीने कोर्टात दिली.  मात्र, आपण फक्त दहा सेकंदासाठी अस केल्याचा त्याने कोर्टात सांगितले.  फक्त 10 सेकंद छेडछाड झाली असेल तर आरोपी दोषी ठरत नाही असं म्हणत कोर्टाने आरोपीला निर्दोष मुक्त केले आहे. कोर्टाने CCTV फुटेज पाहिले असता व्हिडिओमध्ये आरोपी दहा सेकंद तरुणीची छेड काढताना दिसत आहे. या आधारे कोर्टाने हा निर्णय दिला आहे. 


कोर्टाच्या निर्णयाविरोधात संतापाची लाट


कोर्टाच्या निर्णयाविरोधात इटलीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोर्टाच्या निर्णयाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत संताप व्यक्त केला आहे.  10 सेकंद जास्त वेळ नाही हे कोण ठरवते? छेडछाड ही छेडछाड असते. यामुळे याला वेळेच्या परिमाणात मोजणे योग्य नाही. पुरुषांना स्त्रियांच्या शरीराला स्पर्श करण्याचा अधिकार नाही. कोर्टाने आरोपीला निर्दोष मुक्त करत माझ्यावर अन्याय केल्याचे पीडित तरुणीचे म्हणणे आहे.