हाँगकाँग : महिलांवरील वाढते गुन्हे थांबवण्यासाठी आणि अगाऊगिरी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी हाँगकाँग देशाने एक अनोखा पुढाकार घेतला आहे. ज्याअंतर्गत हाँगकाँगमध्ये, संमतीशिवाय, जर कोणी महिलांच्या स्कर्टच्या खालील फोटो काढत असेल किंवा सोशल मीडियावर शेअर करत असेल त्या व्यक्तीस कठोर शिक्षा होवू शकते. गुरुवारी, हाँगकाँगने एक कायदा मंजूर केला आहे. कॉम्बॅट व्हॉयरिझम म्हणजे महिलेच्या परवानगी शिवाय स्कर्ट खालील फोटो काढणे किंवा शेअर करणे हा गुन्हा ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन नियमांनुसार, कोणी महिलांच्या परवानगी शिवाय असं केल्यास त्या व्यक्तीला 5 वर्षांसाठी तुरूंग आणि त्याच्यावर दंडात्मक कारवाई होवू शकते. अनेक लोक इंटरनेटवर असे फोटो शेअर करतात. संबंधित फोटो बाजार, मॉल, कॉफी शॉप किंवा सार्वजनिक ठिकाणी गुप्तपणे घेतली जातात. विधान परिषदेने या कायद्याद्वारे अशा कृत्यांना गुन्हेगारीच्या श्रेणीत टाकले आहे.


केवळ सार्वजनिक ठिकाणीच नाही, तर खासगी ठिकाणी अशी फोटो काढणे किंवा रेकॉर्ड करणे हा एक गुन्हा असणार आहे. देशात अशा प्रकरणांच्या तक्रारी झपाट्याने वाढत आहेत. त्यानंतर हा कायदा मंजूर करण्यात आला आहे. आता हाँगकाँग प्रशासनाला विश्वास आहे की या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर असे गुन्हे कमी होतील.


borneobulletin.com च्या रिपोर्टनुसार, या नव्या कायद्या अंतर्गत फोटो घेणारा आणि शेअर करणारा दोघेही गुन्हेगार समजले जातील. महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा असा विश्वास आहे की, सोशल मीडियावर आता प्रकारच्या फोटोंमध्ये घट होईल. त्याचप्रमाणे, फेसबुक किंवा इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया वेबसाइट्सने नियम मोडल्यास त्यांना न्यायालयात खेचले जाऊ शकतं असा इशारा देखील त्यांनी दिला.