Human will be Immortal: जर तुम्ही अमर झालात तर..?  2045 पर्यंत तुम्ही जगलात तर अमर झालाचं म्हणून समजा... कारण शास्त्रज्ञांनी अमरत्वासंबंधीच्या संशोधनात आजपर्यंतचं सर्वात मोठं यश मिळवलंय. शास्त्रज्ञांनी 2045 ही अमरत्वासाठीची डेडलाईन दिलीय. आंतरराष्ट्रीय विज्ञान संस्था ह्युमॅनिटी फर्स्टचे शास्त्रज्ञ डॉक्टर जोस कॉर्डिरोंनी दावा केलाय की 2030 पर्यंत मनुष्य आपलं वय वाढवू शकेल आणि कमीही करु शकेल. (Immortality formula anti aging secret scientist human will be immortal by 2024 latest marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्वर्ड आणि बोस्टन विद्यापीठात म्हाताऱ्यांना तरुण करणारं संशोधन उंदरांवर यशस्वी झालं. त्या आधारावर डॉक्टर कॉर्डिरोंनी अमरत्वाचा दावा केलाय. त्यात भर पडलीय क्रायोनिक्स संशोधनाची.. काय आहे क्रायोनिक्स संशोधन आणि त्यातील निष्कर्ष काय सांगतात पाहुयात.. 


नेमकं प्रकरण काय?


शरीरात युवा अवस्थेची बॅकअप सिस्टीम असते. वय वाढवणाऱ्या पेशींमध्ये फेरफार शक्य आहेत. उंदरांचे मेंदू, स्नायू आणि किडनीतल्या पेशींवरही प्रयोग यशस्वी ठरलाय. पेशी जीवंत करणाऱ्याच्या दाव्यावर क्रायोनिक्स संशोधन (Cryonics Research) आधारलेलं आहे. मनुष्य मरताच त्याच्या मेंदू आणि ह्रदयापर्यंत ऑक्सिजन आणि रक्ताचा पुरवठा केला जाईल. शरीरातील पेशींमधून पाणी काढून त्यात विशिष्ट रसायन भरलं जाईल. त्याचबरोबर मृत शरीराला -130 अंश तापमानात ठेवलं जाणार आहे. त्यामुळे 2045 पर्यंत मानवी शरीरातील पेशींवरील संशोधन पूर्ण होईल असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.


अमरत्वाबाबत आजपर्यंतचं सर्वात मोठं संशोधन


शास्त्रज्ञांच्या या दाव्यानंतर जगातील अरब आणि खरबपती रिव्हर्स वय संशोधनाद्वारे अमरत्व मिळवण्याठी आतापासूनच तयारीला लागलेत. अनेक लॅब्स या खरबोपतींचं शरीर प्रिजर्व्ह करण्यासाठी कोट्यवधींचं प्रजोक्ट तयार करतायत. जेणेकरुन 2045 पर्यंत आपली शरीर सुरक्षित ठेवू शकतील आणि अमर होऊ शकतील.. अर्थात या अमरत्वाचे दावे अजूनही कागदावरच आहेत. 


आणखी वाचा - Layoffs in IT industries: सावधान! जगावर पुन्हा मंदीचं सावट; तुमची नोकरी धोक्यात तर नाही ना?


एखाद्या प्रयोगाला मान्यता मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तो प्रयोग यशस्वी होण्याची आवश्यकता असते. हार्वर्ड आणि बोस्टनमधला प्रयोग वर्षभर चालला आणि यशस्वीही झाला. मात्र या संशोधनात प्रयोग करण्यात आलेल्या उंदरांची संख्या फारच कमी होती. त्यामुळे हा प्रयोग माणसांवरही तितक्याच प्रमाणात यशस्वी होईल याबाबत मात्र शास्त्रज्ञांच्या मोठ्या गटाला साशंकता आहे.